गुंडांचा कर्दनकाळ 'देवा', शाहिद कपूरचा फर्स्ट लूक व्हायरल! 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 12:59 IST2024-07-19T12:58:32+5:302024-07-19T12:59:43+5:30

शाहिद कपूरच्या आगामी देवा सिनेमातील फर्स्ट लूक रिव्हिल झाला असून या खास दिवशी सिनेमा रिलीज होणार आहे (shahid kapoor, deva)

Shahid Kapoor deva movie release date and first look viral | गुंडांचा कर्दनकाळ 'देवा', शाहिद कपूरचा फर्स्ट लूक व्हायरल! 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

गुंडांचा कर्दनकाळ 'देवा', शाहिद कपूरचा फर्स्ट लूक व्हायरल! 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

शाहिद कपूर हा विविध सिनेमे करुन प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहणारा अभिनेता. शाहिदचा यावर्षी रिलीज झालेला 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. या सिनेमानंतर शाहीदच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. शाहिदचा आगामी सिनेमाचं नाव म्हणजे 'देवा'. या सिनेमातील शाहिदचा फर्स्ट लूक आज रिव्हिल झालाय. याशिवाय या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर झालीय. 

शाहिद कपूरचा 'देवा'मध्ये रावडी अंदाज

'देवा' सिनेमातील शाहिद कपूरचा लूक व्हायरल झालाय. या सिनेमात शाहिद डॅशिंग अन् स्मार्ट अशा पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. हा पोलिस ऑफिसर भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करताना दिसणार आहे. एका हाय प्रोफाईल केसचा तपास शाहिद करताना दिसणार आहे. या सिनेमात पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय पावेल गुलाटी आणि कुब्रा सैत हे कलाकारही 'देवा'मध्ये झळकणार आहेत. 

या तारखेला रिलीज होणार 'देवा' 

आज 'देवा'चा फर्स्ट लूक रिव्हिल झालाय. शिवाय सिनेमाची रिलीज डेटही जाहीर झालीय. हिंसक व्हलेंटाईन डेसाठी तयार राहा.. देवा येतोय.. असं कॅप्शन देत 'देवा'ची रिलीज डेट जाहीर करण्यात आलीय. १४ फेब्रुवारी २०२५ ला 'देवा' थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. शाहिद कपूरचा अँग्री यंग मॅन लूक सर्वांचं लक्ष वेधतोय. याशिवाय शाहिद कपूरच्या फिटनेसचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनही बघायला मिळतंय.

 

Web Title: Shahid Kapoor deva movie release date and first look viral