नोरासोबत डेटिंगच्या चर्चेदरम्यान SRKचा लेक आर्यनचा आणखी एक फोटो व्हायरल, ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 17:17 IST2023-01-07T16:59:30+5:302023-01-07T17:17:52+5:30
आर्यन खानचं नाव अभिनेत्री नोरा फतेही सोबत जोडण्यात आलं होतं, पण आता त्याच्या आणखी एका फोटोने या प्रकरणातील सस्पेंस आणखी वाढवला आहे.

नोरासोबत डेटिंगच्या चर्चेदरम्यान SRKचा लेक आर्यनचा आणखी एक फोटो व्हायरल, ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?
बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान(Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान(Aryan Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाहरुख सध्या त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे, तर त्याचा मुलगा आर्यन खान त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. आर्यन खानचे नाव सातत्याने वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत जोडले जात आहे. काही काळापूर्वी काही सोशल मीडिया युजर्सनी दावा केला होता की आर्यन अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोबत रिलेशनशिपमध्ये आहे, पण आता त्याच्या आणखी एका फोटोने या प्रकरणातील सस्पेंस आणखी वाढवला आहे.
आर्यन आणि नोराच्या डेटिंगच्या अफवा सुरु असतानाच आता आणखी एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ते एका नवीन मुलीसोबत दिसत आहेत. होय, आर्यनचा पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान (Sadia Khan) सोबतचा फोटो व्हायरल होत आहे. सादियासोबतच्या त्याच्या या फोटोवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक सोशल मीडिया यूजर्स आता त्याचे नाव सादियासोबत जोडत आहेत.
आर्यन आणि सादियाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये आर्यनने रेड कर्ल करी टी-शर्ट आणि डेनिम जॅकेट घातलेले दिसत आहे. व्हायरल फोटोमध्ये दोघेही कॅमेऱ्यासाठी पोझ देताना दिसत आहेत. हा फोटो कधीचा आहे याबद्दल सध्या काहीही माहिती मिळालेली नाही, मात्र हा न्यू इयर पार्टीचा फोटो असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही पार्टी दुबईत झाल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हापासून हा फोटो व्हायरल झाला, तेव्हापासून आर्यन खान आणि सादियाच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या. यापूर्वी आर्यन खानचे नाव अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीसोबत जोडले जात होते. एका रेडिट थ्रेडमध्ये त्याचा आणि नोराचा फोटो शेअर करत दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला गेला आहे.
खरं तर, नोरा फतेहीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका महिलेसोबत होती, मात्र आर्यनचा फोटोही त्याच ठिकाणाहून दिसत आहे, यावरुनच आर्यन आणि नोरा फतेही दोघांच्या अफेअरच्या सुरु झाल्या.