"मन्नतमध्ये लग्न करू शकतो का?", चाहत्याची अजब मागणी; किंग खानचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 18:34 IST2023-09-27T18:32:37+5:302023-09-27T18:34:40+5:30
नुकतंच शाहरुखने ट्विटरवर askme सेशन घेतलं. चाहत्याच्या प्रश्नाला किंग खानने अगदी त्याच्या स्टाइलमध्ये हटके रिप्लाय दिला.

"मन्नतमध्ये लग्न करू शकतो का?", चाहत्याची अजब मागणी; किंग खानचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला...
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'जवान' चित्रपटातून शाहरुखने तो बॉलिवूडचा किंग असल्याचं दाखवून दिलं. बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुखचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेकदा तो ट्विटरवरुन चाहत्यांशी askme सेशनमधून संवाद साधताना दिसतो. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शाहरुख उत्तरं देतो.
नुकतंच शाहरुखने ट्विटरवर askme सेशन घेतलं. या सेशनमध्ये त्याला एका चाहत्याने मन्नतबाबत प्रश्न विचारला. "मी मन्नतमध्ये लग्न करू शकतो का?" असा प्रश्न विचारत चाहत्याने शाहरुखकडे अजबच मागणी केली. चाहत्याच्या या प्रश्नाला किंग खानने अगदी त्याच्या स्टाइलमध्ये हटके रिप्लाय दिला. चाहत्याच्या प्रश्नाला रिप्लाय देत किंग खान म्हणाला, "वरात काढण्यासाठी तुझ्याकडे घोडा आहे का?"
Ghodha hai tere paas baraat nikalne ke liye….?? #Jawanhttps://t.co/kh52loznYj
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 27, 2023
दरम्यान, 'पठाण' आणि 'जवान'नंतर शाहरुख 'डंकी'मधून धमाका करणार आहे. शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. अटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखबरोबर विजय सेतुपथी, नयनतारा, दीपिका पदुकोण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.