'द बॅड्स ऑफ बॉलिवूड २'च्या मागणीवर शाहरुख खानची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 10:34 IST2025-10-31T10:33:48+5:302025-10-31T10:34:09+5:30
शाहरुख खानने गुरुवारी सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला.

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड २'च्या मागणीवर शाहरुख खानची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाला...
Shah Rukh Khan on Bads Of Bollywood Season 2: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खानने दिग्दर्शनातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. अलिकडेच आर्यन खाननं दिग्दर्शित केलेली वेबसीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. या सीरिजला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून खूप कौतुक मिळाले. पहिला सीझन हिट झाल्यानंतर, चाहत्यांनी आता थेट शाहरुख खानकडेच दुसऱ्या सीझनसाठी आग्रह धरला आहे. चाहत्यांनी शाहरुखला विनंती केली आहे की, त्याने त्यांचा मुलगा आर्यन खानला लवकरात लवकर मालिकेचा सीझन २ (Season 2) घेऊन येण्यास सांगावे. चाहत्यांच्या या मागणीवर शाहरुखनं भन्नाट प्रतिक्रिया दिली.
शाहरुख खानने गुरुवारी सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. या Q&A सत्रात चाहत्यांनी त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने शाहरुख खानला थेट आर्यनला 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा दुसरा भाग आणायला सांगण्याची विनंती केली. चाहता म्हणाला, "सर, आर्यनला सांगा की आम्हाला द बॅड्स ऑफ बॉलिवूडचा दुसरा भाग हवा आहे". यावर शाहरुख खानने दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि चाहत्यांनाही ते खूप आवडले आहे. शाहरुखनं उत्तर देत म्हटलं, "तुमच्या मुलांना काय करायचे आहे, हे त्यांना सांगणे खूप कठीण आहे. पण मला खात्री आहे की तो (सीझन २) काम करत आहे".
It’s very difficult to tell your children what to do. But I am sure he will be working on it https://t.co/hK7pIkOag0
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 30, 2025
दरम्यान, The Ba***ds of Bollywood ला IMDb वर ७.७ ची रेटिंग मिळालं आहे. या सीरिजमध्ये ७ एपिसोड्स असून प्रत्येक एपिसोड ४० मिनिटांपेक्षा जास्त आहे. पण हे पाहताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही, कारण आर्यनने बॉलिवूडची ग्लॅमर जवळून दाखवलं आहे. त्यात एकाच फ्रेममध्ये अनेक कलाकारांना उभं केलं आहे. या शोमध्ये लक्ष्य लालवानी, सहेर बंबा, अन्या सिंग, राघव जुयाल, बॉबी देओल, करण जोहर, मोना सिंग, गौतमी कपूर, मनीष चौरसिया आणि मनोज पाहवा हे कलाकार आहेत. शाहरुख खान, रणवीर सिंग आणि इमरान हाश्मीसह अनेक सेलिब्रिटींचे कॅमिओ देखील आहेत.
