'जवान'चं धडाकेबाज थीम साँग रिलीज; पुन्हा एकदा प्रेक्षकांवर भूरळ घालण्यास किंग खान यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 17:08 IST2023-07-16T17:07:52+5:302023-07-16T17:08:32+5:30

Jawan: या थीम साँगमध्ये किंग खान पुन्हा एकदा त्याच्या हटके स्टाइलमध्ये दिसला आहे.

shah rukh khan jawan jawan theme song released | 'जवान'चं धडाकेबाज थीम साँग रिलीज; पुन्हा एकदा प्रेक्षकांवर भूरळ घालण्यास किंग खान यशस्वी

'जवान'चं धडाकेबाज थीम साँग रिलीज; पुन्हा एकदा प्रेक्षकांवर भूरळ घालण्यास किंग खान यशस्वी

गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये  शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. अलिकडेच या सिनेमाचा दमदार प्रीव्ह्यू प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या सिनेमातील थीम सॉग रिलीज झालं आहे. विशेष म्हणजे हे गाणं रिलीज झाल्यानंतर अल्पावधीत सोशल मीडियावर ट्रेंड झालं आहे. या थीम साँगमध्ये किंग खान पुन्हा एकदा त्याच्या हटके स्टाइलमध्ये दिसला आहे. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे.

जवानच्या थीम साँगमध्ये शाहरुख दिसत असून हे गाणं अनिरुद्ध रविचंद्रन यांनी कंपोज केलं आहे. तर, राजा कुमारी यांनी ते गायलं आहे.  या थीम साँगमध्ये सिनेमातील काही महत्त्वाचे भाग दाखवण्यात आले आहेत. यातून हा सिनेमा नेमका कशावर आधारित आहे याचा अंदाज लावता येतो.

'जवान'साठी गिरीजाला मिळालं किरकोळ मानधन?; इतर कलाकारांच्या तुलनेत घेतली इतकी कमी फी

दरम्यान,  जवान या सिनेमा शाहरुखसह विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदुकोण, गिरिजा ओक आणि तृप्ती डीमरी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या सिनेमाची निर्मिती शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट अंतर्गत केली आहे. तसंच गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा ७ डिसेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
 

Web Title: shah rukh khan jawan jawan theme song released