शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील ७ गोष्टींवर सेन्सॉर बोर्डाची कात्री; राष्ट्रपतींचा उल्लेख असलेला ‘तो’ डायलॉग बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 02:05 PM2023-08-23T14:05:34+5:302023-08-23T14:06:40+5:30

'जवान' चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री, राष्ट्रपतींचा उल्लेख असलेल्या डायलॉगसह बदलणार ‘या’ ७ गोष्टी

shah rukh khan jawaan movie censor board asked to make this 7 changes including president and NSG reference | शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील ७ गोष्टींवर सेन्सॉर बोर्डाची कात्री; राष्ट्रपतींचा उल्लेख असलेला ‘तो’ डायलॉग बदलणार

शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील ७ गोष्टींवर सेन्सॉर बोर्डाची कात्री; राष्ट्रपतींचा उल्लेख असलेला ‘तो’ डायलॉग बदलणार

googlenewsNext

‘पठाण’नंतर आता बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. ‘जवान’मधील शाहरुखचा फर्स्ट लूक पाहून चाहते भारावून गेले होते. टीझरनंतर आता या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली कुमारने दिग्दर्शित केलेल्या ‘जवान’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून U/A सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. त्याबरोबरच अक्शनचा धमाका असलेल्या शाहरुखच्या जवान चित्रपटातील सात गोष्टींवर सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावली गेली आहे. चित्रपटातील संवाद, सीन्स याबरोबरच आणखी काही गोष्टींमध्ये बदल करण्यास सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे.

 

सेन्सॉर बोर्डाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ‘जवान’ चित्रपटात एकूण सात बदल करण्यात येणार आहेत. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील आत्महत्येच्या सीन कात्री लागून तो छोटा करण्यात आला आहे. तर हिंसा असलेल्या सीनमध्येही अनेक बदल करण्याचं सांगण्यात आलं आहे. या चित्रपटात एका सीनमध्ये डोकं नसलेलं शरीर दाखवण्यात आलं आहे. ‘जवान’मधील या दृश्यावर सेन्सॉरबोर्डाची कात्री लागली आहे. हा सीन चित्रपटातून काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याबरोबरच राष्ट्रपतींवर असलेल्या एका डायलॉगमध्ये बदल करण्यास सांगितले आहेत. या डायलॉगमधील राष्ट्रपतींच्या उल्लेखाऐवजी ‘हेड ऑफ स्टेट’ असं करण्यास सांगितलं आहे.

“सलमानच्या हिट अँड रन केसमुळे चित्रपट फ्लॉप ठरला”, ‘गदर २’ फेम अमीषा पटेलचं मोठं वक्तव्य

‘जवान’ चित्रपटांतील ‘या’ सात गोष्टींमध्ये होणार बदल

  1. आत्महत्येच्या सीन छोटा करण्यात येणार आहे.
  2. डोकं नसलेलं शरीर दाखवण्यात आल्याचा सीन काढून टाकण्यात येणार.
  3. आवश्यक नसलेल्या डायलॉगमधून राष्ट्रपतींचा उल्लेख काढावा लागणार. त्याऐवजी ‘हेड ऑफ स्टेट’ असा उल्लेख केला जाणार.
  4. “पैदा होके” संवादात बदल करुन “तब तक बेटा वोट डालना..” असं करण्यात येणार आहे.
  5. “ऊंगली करना” संवाद बदलून “उससे यूज करो”
  6. “फॉरेन लॅग्वेंज है” आणि “एक्सपोर्ट ट्रेनर फ्रॉम माय कंपनी” हे डायलॉग बदलणार.
  7. चित्रपटातील ‘NSG’ चा उल्लेख “IISG” करण्यात येणार आहे.

“माझ्या सासूचं लग्न”, सिद्धार्थच्या आईसाठी मितालीची खास पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो...”

‘जवान’ चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात विजय थालापथी, नयनतारा हे कलकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून २८ ऑगस्टला सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: shah rukh khan jawaan movie censor board asked to make this 7 changes including president and NSG reference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.