शाहरूखला झालंय तरी काय? बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:49 IST2022-04-18T13:46:25+5:302022-04-18T13:49:16+5:30
Shah Rukh Khan in Baba Siddique Iftaar Party : व्हिडीओतील शाहरूखचं वागणं नेटकऱ्यांना जरा वेगळं वाटलं. मग काय नेटकऱ्यांनी आपआपल्या परीने अंदाज बांधला. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे.

शाहरूखला झालंय तरी काय? बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
Shah Rukh Khan in Baba Siddique Iftaar Party : बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा दरवर्षी रंगते. अनेक सेलिब्रिटी या पार्टीला हजेरी लावतात. दोन चेहरे तर हमखास दिसतात. एक म्हणजे, सलमान खान आणि दुसरा म्हणजे शाहरूख खान (Shah Rukh Khan). दरवर्षी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी रमजान महिन्यात या पार्टीचं आयोजन करतात. यंदा सुद्धा पार्टी रंगली आणि शाहरूख-सलमाननं आवर्जुन हजेरी लावली. सलमान तर पार्टीत नेहमीच्याच मूडमध्ये दिसला. पण शाहरूखचा मूड मात्र काहीसा गेलेला दिसला. साहजिकच सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शाहरूख व बाबा सिद्दीकी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतील शाहरूखचं वागणं नेटकऱ्यांना जरा वेगळं वाटलं. मग काय नेटकऱ्यांनी आपआपल्या परीने अंदाज बांधला. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे.
पार्टीत शाहरूख व बाबा सिद्दीकी स्टेजवरून जात असतात आणि अचानक बाब सिद्दीकी शाहरूखला फोटोसाठी थांबवतात. शाहरूख त्यांच्या विनंतीला मान देत, फोटो तर काढून घेतो. मात्र त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब दिसतं. मीडियाला तो हात हलवत अभिवादन करतो, पण त्यात नेहमीचा जोश नसतो. नेमकी हीच गोष्ट नेटकऱ्यांनी हेरली. मग काय, त्यावरच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
‘शाहरूखला कदाचित मीडियाला पोझ देण्याची इच्छा नाहीये,’असं एकाने लिहिलं. आज कदाचित शाहरूखचा मूड ठीक नव्हता, अशी कमेंट अन्य एका युजरने केली. काही युजरने याचा संबंध थेट आर्यन प्रकरणाशी जोडला. ‘आर्यन प्रकरणात मीडियाने त्याला प्रचंड त्रास दिला. कदाचित म्हणून त्याला मीडियाला पोझ देण्याची इच्छा नसावी,’ असं मत एका युजरने मांडलं. काहींना बाबा सिद्दीकींचं वागणंही खटकलं. त्यांनी ज्या पद्धतीने शाहरूखला थांबवलं, त्यामुळे तो संतापल्याचा अंदाज अनेकांनी बांधला.
शनिवारी रात्री शाहरूख रणबीर कपूर व आलिया भटच्या रिसेप्शन पार्टीला गेला होता. पण मीडियाने क्लिक करू नये म्हणून त्याने गाडीला काळे पडदे लावले होते. विशेष म्हणजे रिसेप्शनमध्ये तो आणि गौरी खान वेगवेगळ्या कारमधून पोहोचले होते.