शाहरुख खानची मुलगी सुहानाचा रडतानाचा फोटो आला समोर, जाणून घ्या काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 13:06 IST2020-08-28T12:57:22+5:302020-08-28T13:06:31+5:30
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.

शाहरुख खानची मुलगी सुहानाचा रडतानाचा फोटो आला समोर, जाणून घ्या काय आहे प्रकरण
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने इन्स्टाग्राम अकऊंट काही दिवसांपूर्वीच प्रायव्हेटवरुन पब्लिक केले आहे. सुहान आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकताच सुहानाने तिच्या रडतानाचा फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करताना सुहानाने लिहिले, ''अभिनंदन जर तुम्ही मला रडताना नाही पाहिले तर..क्वॉरांटाईन फिल्मिंग..''सुहानाच्या कॅप्शनवरुन असे दिसते आहे की, ती घरी तिच्या एका प्रोजेक्टसाठी शूट करते आहे.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सुहानाचा कोणता ना कोणता फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतो. सुहान खानच्या सोशल मीडियावरील अदा बघून असे दिसते की, ती कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला सहज टक्कर देऊ शकते. तिला सोशल मीडियावर चांगले फॅनफॉलोईंग आहे.
मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इच्छा होती. सुहाना अमेरिकेत तिचे शिक्षण पूर्ण करते आहे. लॉकडाऊनच्या आधी ती मुंबईत घरी आली आहे.