विदेशात शिकलेली सुहाना होणार शेतकरी; 1.5 एकर जमिनीसाठी मोजले कोट्यवधी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 09:19 IST2023-06-23T09:18:39+5:302023-06-23T09:19:42+5:30

Suhana khan: सुहानाने शेतीसाठी जमीन खरेदी केली असून या जमिनीसाठी तिने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.

shah rukh khan daughter suhana khan bought land for farming in alibaug and shows herself agriculturist | विदेशात शिकलेली सुहाना होणार शेतकरी; 1.5 एकर जमिनीसाठी मोजले कोट्यवधी रुपये

विदेशात शिकलेली सुहाना होणार शेतकरी; 1.5 एकर जमिनीसाठी मोजले कोट्यवधी रुपये

सध्या कलाविश्वात कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सचीच सर्वाधिक चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतं. यात खासकरुन गेल्या काही दिवसांपासून किंग खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना (Suhana Khan) सातत्याने चर्चेत येत आहे. सुहाना लवकरच जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. यामध्येच आता सुहाना आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. सुहानाने शेतीसाठी जमीन खरेदी केली असून या जमिनीसाठी तिने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुहानाने शेतीसाठी जवळपास दीड एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीसाठी तिने तब्बल १२.९१ कोटी रुपये खर्च केले आहेत. सुहानाने १ जून रोजी ही जमीन खरेदी केली असून स्टॅम्प ड्युटीसाठी तिने ७७ लाख ४६ हजार रुपये भरले आहेत.

दरम्यान, सुहानाने अलिबागमध्ये ही जमीन खरेदी केली आहे.ही जमीन खरेदी करत असताना तिने  स्वत:ला एग्रीकल्चरिस्ट असल्याचं म्हटलं आहे. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

Web Title: shah rukh khan daughter suhana khan bought land for farming in alibaug and shows herself agriculturist