राणी मुखर्जीचा पहिला हिरो आठवतोय का? कुठे गायब झाला 'शोले'तील 'गब्बर'चा लेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 10:04 IST2026-02-24T10:03:29+5:302026-02-24T10:04:17+5:30
Shadaab khan: १९९६ मध्ये रिलीज झालेला 'राजा की आयेगी बारात' या सिनेमात शादाबने मुख्य भूमिका साकारली होती.

राणी मुखर्जीचा पहिला हिरो आठवतोय का? कुठे गायब झाला 'शोले'तील 'गब्बर'चा लेक
बॉलिवूडमध्ये (bollywood) सध्याच्या घडीला अनेक कलाकरांची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, या झगमगत्या दुनियेत असे अनेक कलाकार आहेत जे एकाकी गायब झाले. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे शादाब खान (Shadaab khan). 'शोले' सिनेमातील सुपरहिट ठरलेल्या गब्बरचा म्हणजेच अभिनेता अमजद खान यांचा लेक. शादाबने राजा की आयेगी बारात या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. मात्र, या सिनेमानंतर अचानक तो अभिनय क्षेत्रातून बाहेर पडला.
१९९६ मध्ये रिलीज झालेला 'राजा की आयेगी बारात' हा सिनेमा राणी मुखर्जीचा (rani mukharji) पहिला सिनेमा होता. या सिनेमात तिच्यासोबत शादाबने मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमात अनेक दिग्गज कलाकार असूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.परंतु, या सिनेमामुळे शादाब आणि राणी या दोघांचं नशीब पालटलं. एकीकडे राणीकडे सिनेमांच्या रांगा लागल्या. तर, शादाबला चित्रपट मिळणं मुश्किल झालं. त्यामुळे सध्या तो काय करतो असा प्रश्न अनेकांना पडतो.
शादाबने राजा की आयेगी बारात या सिनेमानंतर 'हे राम, 'बेताबी' आणि 'रिफ्यूजी' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. मात्र त्याला कशातच यश मिळालं नाही. एकंदर त्याचं करिअर फ्लॉप ठरलं. शेवटचा तो 'रोमियो अकबर वॉल्टर'मध्ये झळकला होता. २०२० साली आलेल्या 'स्कॅम १९९२' वेब सीरिजमध्येही तो दिसला. शादाब खानने २९ वर्षात मोजकेच सिनेमे केले. परंतु, अभिनय सोडून आता तो काय करतो? हे जाणून घेऊयात.
कुठे गायब झाला शादाब?
अभिनय बाजूला ठेवून शादाब आता पूर्णवेळ लेखक झाला आहे. वडील अमजद खान यांच्यावर त्याने बायोपिकही लिहिला होता. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्याने याचं लाँचिंग केलं होतं. १९१३ मध्ये त्याची 'शांती मेमोरियल' आणि २०१५ मध्ये 'मर्डर इन बॉलिवूड' ही पुस्तकंही प्रकाशित झाली. तसंच कलाविश्वातही पडद्यामागे तो काम करत असल्याचं म्हटलं जातं.