शबाना आझमींचा ७५ व्या वाढदिवशी जावेद अख्तर यांच्यासोबत रोमँटिक डान्स, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:10 IST2025-09-19T11:49:32+5:302025-09-19T12:10:16+5:30
७५ वर्षीय शबाना आझमींनी पती जावेद अख्तर यांच्यासोबत डान्स केला.

शबाना आझमींचा ७५ व्या वाढदिवशी जावेद अख्तर यांच्यासोबत रोमँटिक डान्स, पाहा Video
सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांची बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध जोडी आहे. दोघेही कायम चर्चेत असतात. नुकतंच शबाना आझमी यांचा ७५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या खास प्रसंगी, या जोडप्याने पाहुण्यांसाठी एकत्र कपल डान्स केला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी कॉनी फ्रान्सिसच्या "प्रीटी लिटिल बेबी" या गाण्यावर डान्स केला. यावेळी सर्व पाहुण्यांंनी टाळ्या वाजवत या जोडप्याचा उत्साह वाढवला. साध्या पण एलिगंट लुकमध्ये शबाना यांचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. तर जावेद अख्तरदेखील तेवढ्याच क्लासिक आणि देखण्या अंदाजात दिसले. त्यांनी लाल रंगाचा कुर्ता आणि काळी नेहरू जॅकेट परिधान केलं होतं.
कोरिओग्राफर फराह खानने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत शबाना यांना शुभेच्छा दिल्या. तिनं लिहलं, "आता ७५ वर्षांच्या झाल्या आहात, शबाना आझमी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही दोघे नेहमी असेच तरुण राहा". फराहनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
शबाना यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. माधुरी दीक्षितनं पती डॉ श्रीराम नेने यांच्यासह हजेरी लावली होती. यासोबतच करण जोहर, उर्मिला मातोंडकर, महीप कपूर, सोनू निगम आणि नीना गुप्ता यांसारख्या अनेक कलाकारांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.