अन् सोहेल खानच्या पत्नीने चिडून नीलमच्या केसांमध्ये च्युईंगम चिकटवला...! स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 11:44 IST2020-12-11T11:41:11+5:302020-12-11T11:44:05+5:30
होय, एका पार्टीत सीमाने काय करावे तर अभिनेत्रीच्या केसांमध्ये च्युईंगम चिकटवले. कारण काय तर इर्षा.

अन् सोहेल खानच्या पत्नीने चिडून नीलमच्या केसांमध्ये च्युईंगम चिकटवला...! स्वत: केला खुलासा
बॉलिवूड स्टार्सच्या पत्नींची चर्चा सध्या जोरात आहे. कारण काय तर करण नेटफ्लिक्सवरची The Fabulous Lives of Bollywood Wives नावाची सीरिज. या सीरिजमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नींच्या मुलाखती, त्यांच्या आयुष्यातील मजेशीर किस्से अशी सगळी धम्माल आहे. या सीरिजमध्ये नुकतीच अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा सचदेव सहभागी झाली. यावेळी सीमाने असा काही खुलासा केला की, सगळेच दंग झालेत.
होय, एका पार्टीत सीमाने काय करावे तर अभिनेत्रीच्या केसांमध्ये च्युईंगम चिकटवले. कारण काय तर इर्षा.
‘नीलमचे केस खूपच चांगले होते, इतके की, ते पाहून मला तिची कायम ईर्षा वाटायची. तिचे केस सर्वात सुंदर आणि लांबसडक होते आणि मला त्याचा राग यायचा. एका पार्टीत मला संधी मिळाली आणि या पार्टीत हळूच तिच्या केसांमध्ये च्युईंगम चिटकवला. अख्ख्या पार्टीत निलम तशीच च्युईंगम घेऊन फिरत होती आणि मी मनातल्या मनात हसत होती,’ असे सीमा म्हणाली.
विशेष म्हणजे, सीमाने हा खुलासा केला तेव्हा नीलम हजर होती. तिने त्यावर काय रिअॅक्शन द्यावी तर तिने सीमाना मूर्ख ठरवले. ती तुझी ईर्षा नव्हती तर तुझा मूर्खपणा होता, असे नीलम यावर म्हणाली.
सोहेल आणि सीमाची लव्हस्टोरी कोणत्याही बॉलिवूड सिनेमाच्या कथेपेक्षा वेगळी नाही. एका कॉमन कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून तिची ओळख सोहेलशी झाली होती. यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि 1998 मध्ये दोघांनीही लग्न केले.
सोहेल खान आणि सीमा सचदेव यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचे नाव निर्वाण खान तर लहान मुलाचे नाव योहान खान आहे. सीमा सध्या एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे. सीमाचा स्वत:चा एक ब्रँड आहे. याशिवाय ती सुजैन खान आणि महिप कपूर यांच्यासोबत बांद्रा 190 नावाचे एक रिटेल बुटीकही चालवते.
मलायका इतकीच ग्लॅमरस आहे सोहेल खानची पत्नी, अशी आहे लव्हस्टोरी