SEE PICS: अरमान की शादी...! भावाच्या वरातीत धम्माल नाचल्या करिना-करिश्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 10:07 IST2020-02-04T10:06:34+5:302020-02-04T10:07:17+5:30

कपूर घराण्याचा लाडका अरमान जैनने गर्लफ्रेन्ड अनीसा मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. या शाही लग्न सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

SEE PICS: armaan jain and anissa malhotra wedding reception photos VIRAL | SEE PICS: अरमान की शादी...! भावाच्या वरातीत धम्माल नाचल्या करिना-करिश्मा

SEE PICS: अरमान की शादी...! भावाच्या वरातीत धम्माल नाचल्या करिना-करिश्मा

ठळक मुद्देअरमानने सुरुवातीला बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न केला.

कपूर घराण्याचा लाडका अरमान जैनने 3 फेब्रुवारीला गर्लफ्रेन्ड अनीसा मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. या शाही लग्न सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. अरमान व अनीसाचा लग्नानंतरचा पहिला फोटोही समोर आला आहे.


लग्नात अरमानने पांढरी शेरवानी घातली होती. तर त्याची पत्नी अनीसा लाल कलरच्या लहंग्यात सुंदर दिसत होती. लाल चुडा आणि ग्रीन एमराल्ड ज्वेलरीने तिच्या सौंदर्याला ‘चार चाँद’ लावले होते.

लग्नाआधी अरमानची धूमधडाक्यात वरात निघाली. यावेळी अरमानच्या चुलत बहीणी करिना कपूरकरिश्मा कपूर यांचा अंदाज बघण्यासारखा होता. करिनाने यावेळी पिवळी चंदेरी साडी परिधान केली होती. तर करिश्माने लाल रंगाची साडी नेसली होती.

लग्नानंतर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी अरमान व अनीसा यांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले.


अरबाज खान, सोहेल खान यावेळी दिसले.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हेही या लग्नाला हजर होते.


अरमान जैनचा भाऊ आदर जैनची कथित गर्लफ्रेन्ड तारा सुतारिया हिचा अंदाजही बघण्यासारखा होता.

अंबानी कुटुंबही यावेळी दिसले. आकाश अंबानी पत्नी श्लोकासोबत अरमानच्या लग्नाला हजर  होता.


अरमान व अनीसा दोघेही बालपणापासूनचे मित्र आहेत. 2014 मध्ये हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. त्यावेळी अरमानने याचा इन्कार केला होता. अनीसा केवळ माझी बालपणीची मैत्रिण आहे, असे त्याने सांगितले होते.  

  अनीसा अनेकदा अरमानसोबत दिसायची. पण दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले आणि योग्य वेळ येताच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अरमान हा रिमा जैन व मनोज जैन यांचा मुलगा आहे. रिमा ही ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूरची बहीण आहे.  

अरमानने सुरुवातीला बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम त्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ आणि ‘एक मैं और एक तू’ या चित्रपटात अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. यानंतर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 2014 साली अरमानने ‘हम दीवाना दिल’ या चित्रपटामधून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा चित्रपट सुपरडुपर फ्लॉप ठरला. यानंतर अरमान कुठल्याच चित्रपटात दिसला नाही. पण करिश्मा, करीना, रणबीर यांच्यासोबत तो अनेक पार्ट्यांना दिसतो.
 

Web Title: SEE PICS: armaan jain and anissa malhotra wedding reception photos VIRAL