हर्षद मेहतानंतर आता बघायला मिळणार मास्टरमाइंड तेलगीची कहाणी, हा अभिनेता साकारणार भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 15:45 IST2022-05-24T15:45:11+5:302022-05-24T15:45:42+5:30
Scam 2003 : The Telgi Story : आता तेलगीच्या भूमिकेसाठी मेकर्सना कलाकार सापडला आहे. अब्दुल करीम तेलगीची भूमिका पडद्यावर अनुभवी थिएटर आर्टिस्ट गगन देव रियार साकारणार आहे.

हर्षद मेहतानंतर आता बघायला मिळणार मास्टरमाइंड तेलगीची कहाणी, हा अभिनेता साकारणार भूमिका
'स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी' च्या यशानंतर देशात दुसरा मोठा घोटाळा सीरीज रूपात बघायला मिळणार आहे. अप्लॉज एन्टरटेन्मेंट आपल्या स्कॅन फ्रंचायजी स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी (Scam 2003 : The Telgi Story) ची घोषणा करून चर्चेत आहे. आता तेलगीच्या भूमिकेसाठी मेकर्सना कलाकार सापडला आहे. अब्दुल करीम तेलगीची भूमिका पडद्यावर अनुभवी थिएटर आर्टिस्ट गगन देव रियार साकारणार आहे.
ही वेबसीरीज कर्नाटकच्या खानापूरमध्ये जन्मलेला एक फळ विक्रेता अब्दुल करीम तेलगीचं जीवन आणि भारतातील एक मोठ्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड बनण्याचा त्याचा प्रवास दाखवणार आहे. अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या या घोटाळ्याने देशाला हादरवून टाकलं होतं. अब्दुल करीम तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा मास्टर माइंड होता.
ही वेबसीरीज पत्रकार संजय सिंह द्वारे लिखित हिंदी पुस्तक 'रिपोर्टर की डायरी'वर आधारित आहे. त्यांनी या सिनेमावेळी ब्रेक घेतला होता. या वेबसीरीजचं दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करणार आहे. मुकेश छाब्रा द्वारे कास्ट करण्यात आलेली ही वेबसीरीज सोनी लिववर स्ट्रीम केली जाईल.