सारा तेंडुलकरच्या बॉलिवूड डेब्यूची पुन्हा रंगली चर्चा, रॉयल ब्लू मिनी ड्रेसमध्ये केलं शूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 09:48 IST2024-07-18T09:47:51+5:302024-07-18T09:48:28+5:30

परदेशात मेडिसीनचं शिक्षण घेतलेली सारा तेंडुलकर अभिनेत्री होणार?

Sara Tendulkar s Bollywood debut once again the talk of the town shot in a cute mini dress | सारा तेंडुलकरच्या बॉलिवूड डेब्यूची पुन्हा रंगली चर्चा, रॉयल ब्लू मिनी ड्रेसमध्ये केलं शूट

सारा तेंडुलकरच्या बॉलिवूड डेब्यूची पुन्हा रंगली चर्चा, रॉयल ब्लू मिनी ड्रेसमध्ये केलं शूट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा (Sara Tendulkar) ही काही अभिनेत्री नसली तरी तिची बी टाऊनमध्ये चर्चा असते. सारा दिसायला खूपच सुंदर असून ती काही जाहिरातींमध्ये झळकली आहे. ती अनेक ब्रँड्सची अँबेसिडरही आहे. तसंच बॉलिवूडमध्ये स्टारकिड्ससोबत सारा अनेकदा दिसते. त्यामुळे सिनेमा न करताही साराची बीटाऊनमध्ये चर्चा असते. मात्र आता तिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा रंगली आहे. शूटिंग सेटवरुन तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ती खूपच क्युट दिसत आहे.

सारा तेंडुलकर नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसते. तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत. सारा परदेशात मेडिसीनचं शिक्षण घेत आहे. शिवाय ती भारतात आल्यावर मॉडेलिंगमध्ये अॅक्टिव्ह असते. काही वर्षांपासूनच साराच्या बॉलिवूडच्या चर्चा सुरु आहेत. आता शूटिंग सेटबाहेरील या व्हिडिओनंतर तिच्या डेब्यूचीच चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. रॉयल निळ्या रंगाच्या सैटन मिनी ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्यासोबत तिची टीम आहे. सारा व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना दिसत आहे. इन्स्टंट बॉलिवूड पेजने व्हिडिओ शेअर केला आहे.

साराच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिच्या बॉलिवूड डेब्यूचाच उल्लेख केला आहे. टेली टक्करच्या रिपोर्टने दावा केला की साराला अभिनयाची आवड आहे. तसंच यामध्ये करिअर करण्याचीही तिची इच्छा आहे. इतकंच नाही कर तिने अॅक्टिंग क्लासही घेतले आहेत. साराला अभिनेत्री म्हणून पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे 60 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

Web Title: Sara Tendulkar s Bollywood debut once again the talk of the town shot in a cute mini dress