ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:59 IST2025-05-21T09:58:16+5:302025-05-21T09:59:11+5:30

गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या अफेअरची चर्चा होती.

sara tendulkar and siddhant chaturvedi rumoured to have broken up | ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा

ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा

'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आजकाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. मध्यंतरी तो अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीला डेट करत होता. दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांची गोवा ट्रीपही चर्चेत होती. मात्र अचानक या कपलचं ब्रेकअप झालं. तर गेल्या काही दिवसांपासून सिद्धांत चतुर्वेदी चक्क सारा तेंडुलकरला (Sara Tendulkar) डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण आता सारासोबतही त्याचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे.

ईटाइम्स रिपोर्टनुसार, सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकरचं नातं संपलं आहे. सिद्धांतनेच ब्रेकअपचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या अफेअरची चर्चा होती. त्यांनी काही महिने एकमेकांना डेट केलं. एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न केला. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. विशेष म्हणजे एकमेकांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर सिद्धांतने ब्रेकअपचा निर्णय घेतला असंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सारा याआधी शुभमन गिलला डेट करत होती अशा चर्चा होत्या. मात्र तिने कधीच ते नातं स्वीकारलं नव्हतं. तर सिद्धांत आणि सारानेही कधीच नात्याची कबुली दिली नव्हती. 

सारा आणि सिद्धांत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले होते. फिल्मफेअरने तसं वृत्त दिलं होतं. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र काही दिवसातच त्यांच्या ब्रेकअपची बातमी आल्याने त्यांचे चाहते नाराज झालेत. 

सिद्धांत चतुर्वेदीच्या कामाबद्दल सांगायचं तर तो शेवटचा 'युद्ध्रा' सिनेमात दिसला होता. आता तो आगामी 'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग' आणि 'धडक २' मध्ये दिसणार आहे.

Web Title: sara tendulkar and siddhant chaturvedi rumoured to have broken up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.