"माझं GPay खातं सुद्धा लिंक आहे" सारा अली खानच्या एक-एक पैशांचा ठेवला जातो हिशोब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 17:49 IST2025-03-28T17:49:40+5:302025-03-28T17:49:54+5:30

नुकतंच साराने एका मुलाखतीमध्ये तिचा पैसा कोण हाताळतं, याबद्दल सांगितलं. 

Sara Ali Khan's Mom Amrita Singh Manages Her Finances She Says Even My Gpay Account Is Linked To | "माझं GPay खातं सुद्धा लिंक आहे" सारा अली खानच्या एक-एक पैशांचा ठेवला जातो हिशोब

"माझं GPay खातं सुद्धा लिंक आहे" सारा अली खानच्या एक-एक पैशांचा ठेवला जातो हिशोब

Sara Ali Khan's Money Manager: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री आहे, जी तिच्या सुंदर शैलीने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. बॉलिवूडच्या या दिवाचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ रोजी झाला होता. सारा ही अभिनेत्री अमृता सिंह आणि अभिनेता सैफ अली खान यांची मुलगी आहे. सारा ही तिच्या चित्रपटांप्रमाणेच तिच्या वैयक्तिग आयुष्याबद्दलही कायम चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच साराने एका मुलाखतीमध्ये तिचा पैसा कोण हाताळतं, याबद्दल सांगितलं. 

साराच्या पैशांच सर्व नियोजन तिची आई म्हणजे अमृता सिंह करते.  सारा अली खानने टाईम्स नाऊशी बोलताना म्हटलं, "वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी, हे मी शिकले आहे. माझी आई सर्व पैसे हाताळते. माझे गुगल पे अकाउंट देखील त्यांच्याशी लिंक केलेले आहे. तिला OTP जातात. तिच्याकडून ओटीपी मिळाल्याशिवाय मी तिकीटही बुक करू शकत नाही. म्हणून तिला नेहमीच माहित असते की मी कुठे आहे". 



सारा अली खानच्या मानधनाबद्दल बोलायचं झाले तर, रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' चित्रपटासाठी तिने ५० लाख रुपये घेतल्याचं वृत्त आहे. यानंतर तिने अडीच कोटींवरून तीन कोटींवर झेप घेतली. यानंतर 'कुली नंबर १' साठी २.५ ते ३ कोटी रुपये घेतले होते. यानंतर साराने 'जरा हटके जरा बच्चे' या चित्रपटासाठी ४ कोटी रुपये मानधन घेतलं. आता सध्या सारा अली एका चित्रपटासाठी ५-७ कोटी रुपये फी आकारते. 

 साराने २०१८ मध्ये पदार्पण केले. ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत 'केदारनाथ' चित्रपटात दिसली होती. सारा अली खान तिच्या पहिल्याच चित्रपटातून मोठी प्रसिद्ध मिळाली. राने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं होतं. ती शेवटची 'स्काय फोर्स' चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती 'मेट्रो.. इन दिनो' या खास सिनेमात दिसणार आहे. गाजलेल्या 'लाईफ इन अ मेट्रो' सिनेमाचा हा पुढचा भाग असणार आहे.

Web Title: Sara Ali Khan's Mom Amrita Singh Manages Her Finances She Says Even My Gpay Account Is Linked To

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.