हिला ओळखलत का ? फोटोत दिसणारी चिमुकली आज स्टार अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 17:59 IST2023-09-13T17:58:36+5:302023-09-13T17:59:47+5:30

साराने नुकतेच इन्स्टाग्रामवर आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.

Sara Ali Khan shares childhood photo | हिला ओळखलत का ? फोटोत दिसणारी चिमुकली आज स्टार अभिनेत्री

Sara Ali Khan

बॉलिवूडचे सेलिब्रेटी नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. तसंच त्यांच्या बाबत जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. तर सध्या अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे ते लहानपणीचे फोटो पाहून नेटकऱ्यांमध्येही उत्सुकता निर्माण होते की नक्की ही सेलिब्रेटी कोण असेल.  नुकताच असाच एक फोटो समोर आला आहे, जो ओळखणे खूप कठीण होत आहे. 


ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती सारा अली खान आहे. साराने नुकतेच इन्स्टाग्रामवर आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोतून सारा लहानपणापासूनच अगदी बिनधास्त आणि मस्तीखोर असल्याचं दिसतं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर साराने आपल्या अभिनयानं सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. तिच्या लोकप्रियतेतही फार मोठी वाढ झालीय. 

अभिनेत्री सारा अली खानचं एकेकाळी वजन खूप होतं. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने ४० किलो वजन कमी केलं. तिचा हा वेटलॉस प्रवास  प्रेरणादायी आहे. तिचे जुने फोटो देखील खूप व्हायरल होत असतात. मात्र, साराने कधी तिच्या आधीच्या फोटोंबाबत अथवा दिसण्याबाबत संकोच बाळगला नाही. तिने वेळोवेळी तिचा अनुभव शेअर केला आहे.

साराचा नुकताच 'जरा हटके जरा बचके' सिनेमा रिलीज झाला. बॉक्सऑफिसवर सिनेमाने बऱ्यापैकी कमाई केली. तसंच साराच्या अभिनयाचंही कौतुक झालं. आता ती अनुराग बासूच्या 'इन दिनो' सिनेमात दिसणार आहे. तसंच 'ऐ वतन मेरे वतन' सिनेमातही तिची मुख्य भूमिका आहे.

Web Title: Sara Ali Khan shares childhood photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.