"आई झाल्यानंतर स्त्रियांना नोकरी..." सान्या मल्होत्राने मांडलं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:36 IST2025-01-29T11:36:29+5:302025-01-29T11:36:44+5:30
अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या तिच्या आगामी 'मिसेस' (Mrs.) या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे.

"आई झाल्यानंतर स्त्रियांना नोकरी..." सान्या मल्होत्राने मांडलं रोखठोक मत
Sanya Malhotra: 'दंगल' चित्रपटातील बबिता कुमारी किंवा 'पगलेट'मधील संध्या असो अभिनेत्री सान्या मल्होत्राने (Sanya Malhotra) नेहमीच पडद्यावर सशक्त स्त्रीच्या भुमिका साकारल्या आहेत. आताही ती लवकरच 'मिसेस' (Mrs.) चित्रपटातून रिचा म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिनं एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. अलिकडेच चित्रपटाच्या प्रोमोशनच्या निमित्ताने तिने एक मुलाखत दिली. यावेळी सान्यानं महिलांच्या प्रश्नांवर भाष्य केलं.
सान्या मल्होत्रानं लग्नानंतर महिलाच्या आयुष्यात होणाऱ्या बदलावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मिड डेच्या वृत्तानुसार, सान्या म्हणाली, "महिलांकडून खूप अपेक्षा ठेवल्या जातात. मुलाला जन्म दिल्यानंतर महिलांनी नोकरी सोडणे खूप सामान्य झालं आहे. पण, मुल हे दोघाचं असेल तर बरं होईल. मुलाला सांभाळण्याची जबाबदारी पती आणि पत्नी अशी दोघांची आहे. असं झाल्यास योग्य समतोल राखला जाईल".
'मिसेस' (Mrs.) या चित्रपटात सान्या एका नवविवाहित वधूच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. 'मिसेस' (Mrs.) हा चित्रपट आतापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आहे. येत्या ७ फेब्रुवारीपासून ZEE5 वर सान्या मल्होत्राचा हा चित्रपट पाहू शकता. सान्या मल्होत्राचा 'मिसेस' हा चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जर तुम्हाला 'द ग्रेट इंडियन किचन' हा चित्रपट पहायचा असेल तर तो सध्या OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.
सान्या मल्होत्राने बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं आहे. आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात ती झळकली होती. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात सानियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'बधाई हो', 'शंकुतला देवी' या चित्रपटांतही सान्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'लुडो' या वेब सीरिजमध्ये सान्या मल्होत्राने अभिषेक बच्चनबरोबर मुख्य भूमिका साकारली होती.