'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 17:08 IST2024-11-27T17:07:43+5:302024-11-27T17:08:50+5:30
आलिया आणि रणबीरच्या फोटोंनी वेधलं लक्ष

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
संजय लीला भन्साळींच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' (Love & War) सिनेमाची जोरदार चर्चा आहे. सिनेमातील स्टारकास्टही तगडीच आहे. रणबीर कपूर(Ranbir Kapoor), आलिया भट (Alia Bhatt) ही रियल लाईफ जोडी सोबत विकी कौशल (Vicky Kaushal) अशी तिकडी सिनेमात पाहायला मिळणार आहे. तिघेही एकापेक्षा एक कलाकार आहेत. त्यात भन्साळी दिग्दर्शक असल्याने पडद्यावर वेगळीच जादू बघायला मिळेल हे नक्की. दरम्यान सिनेमाचं शूट सुरु झालं असून सेटवरुन काही फोटोही लीक झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच आलिया भट आणि विकी कौशलने सिनेमाच्या शूटला सुरुवात केली होती. ८० च्या दशकातील डिस्को सेटवर हे शूट सुरु होतं. कलाकार यामध्ये रेट्रो लूकमध्ये दिसणार आहेत. आता नुकतंच सेटवरुन रणबीर आणि आलियाचा लूकच लीक झाला आहे. दोघंही व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहेत. रणबीर इन केलेला व्हाईट शर्ट, ब्लॅक पँटमध्ये दिसतोय. तसंच त्याची 80s स्टाईल मिशीही आहे. तर दुसरीकडे आलिया भटचा ८० च्या दशकातला हुबेहुब लूक करण्यात आला आहे. वर बांधलेले केस, डोळ्यांचा मेकअप अगदी तसाच आहे.
हे फोटो पाहून चाहतेही उत्सुक झाले आहेत. सिनेमाची कशा 80 च्या काळातली असण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात सिनेमा रिलीज होणार आहे.
रणबीर कपूरनेसंजय लीला भन्साळींच्याच 'सावरिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तो पुन्हा भन्साळींसोबत तब्बल १७ वर्षांनी काम करत आहे. तर आलिया भटने भन्साळींचा 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमा केला होता. विकी कौशल पहिल्यांदाच त्यांच्यासोबत काम करणार आहे.