‘Munnabhai MBBS ’मधील ‘स्वामी’ आठवतोय? आत्ता पाहाल तर व्हाल कन्फ्युज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 08:00 IST2022-07-12T08:00:00+5:302022-07-12T08:00:01+5:30

Munnabhai MBBS : भित्रा, अभ्यासू स्वामी कोणीही विसरणं शक्य नाही. सध्या स्वामी काय करतो, तो कुठे असतो असेच प्रश्न तुम्हालाही पडले असतीलच... 

Sanjay Dutt’s Roommate Swami From Munna Bhai MBBS Khurshed Lawyer latest pics | ‘Munnabhai MBBS ’मधील ‘स्वामी’ आठवतोय? आत्ता पाहाल तर व्हाल कन्फ्युज

‘Munnabhai MBBS ’मधील ‘स्वामी’ आठवतोय? आत्ता पाहाल तर व्हाल कन्फ्युज

छोट्या छोट्या भूमिकांमुळे लोकप्रिय झालेले अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आहेत. यापैकी काही कलाकार आजही इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहेत. काही मात्र इंडस्ट्रीपासून अचानक दुरावले. खुर्शीद लॉयर (Khurshed Lawyer ) हा असाच एक अभिनेता. राजकुमार हिरानींचा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (Munna Bhai MBBS) हा सिनेमा पाहिला असेल तर खुर्शीद लॉयरने साकारलेला स्वामी तुम्हाला आठवत असेलच. होय, या चित्रपटात खुर्शीदने नागराजन स्वामीची भूमिका साकारली होती. भूमिका लहान होती पण मजेदार होती.  भित्रा, अभ्यासू स्वामी कोणीही विसरणं शक्य नाही. सध्या स्वामी काय करतो, तो कुठे असतो असेच प्रश्न तुम्हालाही पडले असतील... 

 ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात अनेक दमदार पात्र प्रेक्षकांना पाहायला मिळाली.  चित्रपटातील मुन्ना असो किंवा सर्किट, डॉक्टर अस्थाना असो किंवा मग चिंकी, प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसला. बहुविध कलाकारांची गर्दी असणाऱ्या या चित्रपटामधील लक्षात राहिलेला असाच एक चेहरा स्वामीचा होता. स्वामी हा मुन्नाभाई अर्थात संजय दत्तचा (Sanjay Dutt) रूममेट होता. सोबत चांगला मित्र सुद्धा. चित्रपटातील खुर्शीदने साकारलेल्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं होतं. 

2003 साली आलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधून खुर्शीदने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती. यानंतर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात तो छोट्या छोट्या भूमिका करताना दिसला. आज हाच खुर्शीद कसा दिसतो? तर त्याला पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
खुर्शीदचा लुक पूर्णपणे बदलला आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये खुर्शीद अगदी सडपातळ होता. पण आता त्याचं वजन चांगलंच वाढलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Khurshed Lawyer (@khurshedswami)

खुर्शीदने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’नंतर ‘डबल धमाल’ व ‘अजब प्रेम की गजब कहानी’सह अनेक चित्रपटात काम केलं. यानंतर तो अचानक बॉलिवूडमधून गायब झाला. खूप मोठ्या ब्रेकनंतर अलीकडे तिग्मांशू धूलियाच्या ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ या वेबसीरिजमध्ये तो झळकला होता. या वेबसीरिजद्वारे त्याने चार वर्षानंतर कमबॅक केलं होतं.

Web Title: Sanjay Dutt’s Roommate Swami From Munna Bhai MBBS Khurshed Lawyer latest pics