संजय दत्तच्या खरंच ३०८ गर्लफ्रेंड होत्या? ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसाठी आजारी पत्नीकडेही केलेलं दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 11:10 AM2023-07-29T11:10:23+5:302023-07-29T11:12:00+5:30

Sanjay Dutt Birthday : संजय दत्त त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत होता. त्याचे अनेक अभिनेत्रींबरोबरही प्रेमसंबंध होते.

sanjay dutt birthday bollywood actor had an affair with 308 girlfriends love life story | संजय दत्तच्या खरंच ३०८ गर्लफ्रेंड होत्या? ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसाठी आजारी पत्नीकडेही केलेलं दुर्लक्ष

संजय दत्तच्या खरंच ३०८ गर्लफ्रेंड होत्या? ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसाठी आजारी पत्नीकडेही केलेलं दुर्लक्ष

googlenewsNext

बॉलिवूडचा खलनायक अशी ओळख मिळवलेला सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचा आज वाढदिवस आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘धमाल’, ‘अग्निपथ’, ‘भूज’, ‘शब्द’ अशा जवळपास १८७ चित्रपटांत संजय दत्त विविधांगी भूमिका साकारताना दिसला. पण, प्रेक्षकांनी त्याला हिरोपेक्षा व्हिलनच्या भूमिकेत जास्त पसंत केलं. संजय दत्त हा दिग्गज अभिनेते सुनील दत्त आणि अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा मुलगा आहे. बॉलिवूडमधील करिअरपेक्षा तो वैयक्तिक जीवनातील घटनांमुळे जास्त चर्चेत होता. त्याचे अनेक मुलींशी प्रेमसंबंधही होते.

मीडिया रिपोर्टनुसार, संजय दत्तचं तब्बल ३०८ मुलींशी अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकावेळी तीन मुलींबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा त्याने स्वत:च केला होता. २०१८ साली त्याच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. या चित्रपटात संजय दत्तने त्याच्या ३०८ गर्लफ्रेंड होत्या, असा खुलासा केला होता.

एका मुलाखतीत संजय दत्तने एकाच वेळी तीन मुलींबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचंही सांगितलं होतं. तीन मुलींबरोबर रिलेशनशिपमध्ये असूनही कधीच पकडलो गेलो नाही, असंही तो म्हणाला होता. संजय दत्तचं नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. माधुरी दीक्षितबरोबर त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. माधुरीसाठी संजय दत्तने आजारी पत्नीकडेही दुर्लक्ष केल्याचं बोललं जातं.

संजय दत्तने १९८७ मध्ये ऋचा शर्माशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर काही दिवसांनी ऋचाला ब्रेन ट्युमरचं निदान झालं होतं. उपचार घेण्यासाठी ऋचा अमेरिकला गेली होती. त्यादरम्यान संजय दत्त बॉलिवूडमध्ये व्यग्र होता. १९९१ साली साजन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यातील जवळीक वाढली होती. त्यांच्या नात्याबद्दल कळताच ऋचा अमेरिकेहून भारतात परतली होती. परंतु, आजारी असलेल्या आपल्या पत्नीला संजय दत्त एअरपोर्टवर घ्यायलाही गेला नव्हता. १९९६ साली ऋचाचं निधन झालं. त्यानंतर त्याने १९९८ साली रिया पिल्लाईबरोबर लग्न केलं होतं. २००८ साली घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यानंतर संजय दत्तने मान्यता दत्तशी विवाह केला. त्याला तीन मुलं आहेत. 

Web Title: sanjay dutt birthday bollywood actor had an affair with 308 girlfriends love life story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.