Sania Mirza: सानिया मिर्झा रुग्णालयात, नक्की झालं काय? स्वत:च पोस्ट करत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 18:22 IST2024-02-23T18:22:09+5:302024-02-23T18:22:49+5:30
सानियाने पोस्ट केला हॉस्पिटलमधला फोटो, अनेकांना पडला प्रश्न

Sania Mirza: सानिया मिर्झा रुग्णालयात, नक्की झालं काय? स्वत:च पोस्ट करत दिली माहिती
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) सध्या तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने तिसरं लग्न करत सर्वांनाच धक्का दिला. यानंतर सानियाने काही महिन्यांपूर्वीच शोएबपासून खुला घेतल्याचं जाहीर केलं. यानंतर भारतातूनच नाही तर पाकिस्तानचे लोकही सानियाच्या बाजूने उभे राहिले. सर्वांनीच शोएबला नावं ठेवली. आता सानियाची एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं दिसत आहे.
सानिया मिर्झाचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या घटस्फोटानंतर अनेक लोक सानियाला पाठिंबा देत आहेत. सध्या ती कठीण परिस्थितीतून जात असली तरी तिचं कुटुंब तिच्यामागे खंबीरपणे उभं आहे. सानिया तिचा ५ वर्षीय मुलगा इजहानसोबत खूश आहे. मग तिला असं झालं काय की ती थेट रुग्णालयात पोहोचली असा प्रश्न अनेकांना पडलाय. सानियानेच इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत याचा खुलासा केला आहे. सानिया स्क्रीन ट्रीटमेंटसाठी डर्मेटोलॉजिस्टकडे पोहोचली आहे. तसंच स्कीन स्पेशालिस्ट सानियाची मैत्रिणच आहे. तिने मैत्रिणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, 'नेहमी माझे स्कीन प्रॉब्लेम दूर करणारी माझी जवळची मैत्रीण.'
सानियाने पोस्ट केलेला फोटो रुग्णालयातील असल्याने आधी तिचे चाहते घाबरले. मात्र ती स्कीन स्पेशालिस्टकडे आल्याचं कळताच त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सानिया सध्या तिचा मुलगा, बहीण आणि भाचीसोबत वेळ घालवत असते. काही दिवसांपूर्वीच ती टेनिसपटू रोहन बोपन्नाच्या पार्टीत दिसली होती.