दीपिकानंतर आता अल्लू अर्जुनलाही बाय बाय! संदीप रेड्डींनी बिग बजेट सिनेमातून अभिनेत्याचा पत्ता केला कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:21 IST2025-06-12T15:21:21+5:302025-06-12T15:21:57+5:30

आधी दीपिकाला काढलं, आता संदीप वांगा रेड्डींनी अल्लू अर्जुनचाही केला पत्ता कट! मोठ्या प्रोजेक्टमधून दिला डच्चू

Sandeep Reddy vanga removed allu arjun from big project after deepika padukone | दीपिकानंतर आता अल्लू अर्जुनलाही बाय बाय! संदीप रेड्डींनी बिग बजेट सिनेमातून अभिनेत्याचा पत्ता केला कट

दीपिकानंतर आता अल्लू अर्जुनलाही बाय बाय! संदीप रेड्डींनी बिग बजेट सिनेमातून अभिनेत्याचा पत्ता केला कट

काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी त्यांच्या बहुचर्चित स्पिरिट सिनेमातून आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला बाहेरचा रस्ता दाखवला. त्या पाठोपाठ आता संदीप रेड्डी यांनी अल्लू अर्जुनचाही पत्ता कट केल्याचं बोललं जात आहे. सिनेमाचं शूटिंगही थांबवलं गेल्याचं सांगण्यात येत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, संदीप रेड्डी वांगा यांनी एका मोठ्या प्रोजेक्टमधून अल्लू अर्जुनला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गेल्या वर्षी अल्लू अर्जूनने संदीप रेड्डी यांच्यासोबत एक सिनेमा साइन केला होता. त्यातून आता अभिनेत्याचा पत्ता कट केला आहे. याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अल्लू अर्जुनच्या जागी आता या प्रोजेक्टमध्ये ज्युनियर एन टीआरची एन्ट्री झाल्याचंही सांगितलं जात आहे. 


दरम्यान, संदीप रेड्डींच्या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला असला तरी अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोण नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. साऊथ दिग्दर्शक अॅटली कुमारच्या सिनेमात त्यांची वर्णी लागली आहे. AA22xA6 या सिनेमात दीपिका आणि अल्लू अर्जुन दिसणार आहेत. यामध्ये अल्लू अर्जुनचा डबल रोल असेल. २०२६ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Sandeep Reddy vanga removed allu arjun from big project after deepika padukone