अक्षय कुमारने सोनू सूद व संजय दत्तसोबत प्रमोशन करण्यास दिला नकार?, 'पृथ्वीराज' टीममध्ये फूट...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:55 PM2022-05-31T12:55:44+5:302022-05-31T12:56:34+5:30

Samrat Prithviraj Controversy: अक्षय व मानुषी दोघंही सध्या ‘सम्राट पृथ्वीराज’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचदरम्यान पडद्यामागची एक शॉकिंग बातमीही कानावर येतेय. होय, टीम ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये सगळं काही ठीक नसल्याची चर्चा आहे.

samrat prithviraj akshay kumar refuse to take sanjay dutt and sonu sood for promotio | अक्षय कुमारने सोनू सूद व संजय दत्तसोबत प्रमोशन करण्यास दिला नकार?, 'पृथ्वीराज' टीममध्ये फूट...

अक्षय कुमारने सोनू सूद व संजय दत्तसोबत प्रमोशन करण्यास दिला नकार?, 'पृथ्वीराज' टीममध्ये फूट...

googlenewsNext

अक्षय कुमार (Akshay Kumar ) व मानुषी छिल्लरचा ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा सिनेमा येत्या 3 जूनला चित्रपटगृहांत रिलीज होतोय. मानुषीचा हा पहिला चित्रपट आहे. याद्वारे बॉलिवूडमध्ये तिचा डेब्यू होतोय. अक्षय व मानुषीशिवाय संजय दत्त (Sanjay Dutt ) व सोनू सूद (Sonu Sood) यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अक्षय व मानुषी दोघंही सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचदरम्यान पडद्यामागची एक शॉकिंग बातमीही कानावर येतेय. होय, टीम ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये सगळं काही ठीक नसल्याची चर्चा आहे. अक्षयने सोनू सूदसंजय दत्तसोबत या चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिल्याचीही चर्चा आहे.


केआरकेनं याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘टीम पृथ्वीराज मांजरांसारखी भांडतेय. अक्षय कुमारने सोनू सूद व संजय दत्तसोबत प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. प्रोड्यूसर आदित्य चोप्रा अक्कीला सपोर्ट करत आहेत तर डायरेक्टरची संपूर्ण टीमसोबत प्रमोशन करण्याची इच्छा आहे. अक्षयने आदित्यला भाजपाच्या सपोर्टची खात्री दिली आहे...,’ असं एक ट्विट केआरकेनं केलं आहे. यात किती तथ्य आहे, ठाऊक नाही. पण याट्विटची जोरदार चर्चा आहे.

अक्षयचा याआधी रिलीज झालेला ‘बच्चन पांडे’ सुपर फ्लॉप झाला होता. आता ‘सम्राट पृथ्वीराज’कडून त्याला मोठ्या अपेक्षा आहेत. नेहमीप्रमाणे अक्षयकडे चित्रपटांची रांग लागली आहे. त्याचे अनेक सिनेमे येत्या काळात रिलीज होणार आहेत. मिशन सिंड्रेला, रक्षाबंधन, रामसेतू, गोरखा, ओह माय गॉड 2, बडे मियां छोटे मियां, मोगुल अशा अनेक सिनेमात तो दिसणार आहे. याशिवाय लवकरच अक्कीचा डिजिटल डेब्यूही होतोय. द एंड या सीरिजमध्ये तो झळकणार आहे.

Web Title: samrat prithviraj akshay kumar refuse to take sanjay dutt and sonu sood for promotio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.