समय रैनाने आर्यनच्या दुखऱ्या नसेवर ठेवलं बोट; टी-शर्टवर असं काय लिहिलं की सर्वत्र होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:47 IST2025-09-18T13:44:38+5:302025-09-18T13:47:08+5:30

समय रैनाने बॅड्स ऑफ बॉलिवूडच्या प्रीमियरला परिधान केलेल्या टीशर्टने सर्वांचं लक्ष वेधलंय. त्यामुळे समयने आर्यन खानचं जुनं प्रकरण पुन्हा उकरुन काढल्याची चर्चा आहे

samay raina t short got attention of aryan khan drug case bads of bollywood | समय रैनाने आर्यनच्या दुखऱ्या नसेवर ठेवलं बोट; टी-शर्टवर असं काय लिहिलं की सर्वत्र होतेय चर्चा

समय रैनाने आर्यनच्या दुखऱ्या नसेवर ठेवलं बोट; टी-शर्टवर असं काय लिहिलं की सर्वत्र होतेय चर्चा

आर्यन खानच्या दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सिरीजच्या प्रीमियरमध्ये स्टँड-अप कॉमेडियन समय रैना त्याच्या अनोख्या टी-शर्टमुळे चर्चेत आला आहे. समयने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. ज्यावर असा एक संदेश होता तो वाचून सर्वांना आश्चर्य वाटलं. याशिवाय काहींनी समयच्या विनोदबुद्धीचं कौतुक केलं. समयने टी-शर्टवर असं काय लिहिलं होतं, ज्यामुळे लोकांना आर्यन खानचं जुनं प्रकरण आठवलं. जाणून घ्या

समय रैनाच्या टीशर्टची चर्चा

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसीरिजच्या प्रीमिअरच्या वेळेस सर्व लोकांचं लक्ष समयच्या टी-शर्टकडे गेलं आणि लगेचच सोशल मीडियावर याबद्दल चर्चा सुरू झाली. समयच्या टी-शर्टवर SAY NO TO CRUISE (क्रूझला नाही म्हणा) अशी अक्षरं होती. त्यावर नेटिझन्सनी म्हटलं की, 'समयने आर्यन खानच्या २०२१ मधील क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचं एकप्रकारे विडंबन केलं आहे;. काही युजर्सनी त्याच्या हिंमतीचे कौतुक केले. 'आर्यन खानच्या वेबसीरिजच्या प्रीमियरला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या समयने त्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे', असं म्हणत काहींनी नाराजीही व्यक्त केली.




काय होतं प्रकरण?

हे प्रकरण ऑक्टोबर २०२१ मध्ये घडले होते, जेव्हा एनसीबीने एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता आणि आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर आर्यनला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले, परंतु हे प्रकरण खूप गाजले होते. समय रैनाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी त्याच्या टी-शर्टने नक्कीच लक्ष वेधून घेतले. दरम्यान 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसीरिजचं दिग्दर्शन आर्यन खानने केलं आहे. या वेबसीरिजचे एकूण सात भाग असून ती आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. या वेबसीरिजनिमित्ताने आमिर-शाहरुख-सलमान पहिल्यांदा एकत्र आले आहेत.

Web Title: samay raina t short got attention of aryan khan drug case bads of bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.