नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu मोठी उडी, साइन केला हॉलिवूड सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 15:48 IST2021-11-26T15:45:43+5:302021-11-26T15:48:00+5:30
गेल्याच महिन्यात सामंथाने पती नागा चैतन्य (Naga Chaitanya) पासून घटस्फोट घेऊन फॅन्सना एक मोठा धक्का दिला. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आहे.

नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu मोठी उडी, साइन केला हॉलिवूड सिनेमा
साउथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. गेल्याच महिन्यात सामंथाने पती नागा चैतन्य (Naga Chaitanya) पासून घटस्फोट घेऊन फॅन्सना एक मोठा धक्का दिला. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण यावेळी कारण प्रोफेशनल आहे. सामंथाच्या हाती एक मोठा हॉलिवूड सिनेमा लागला आहे.
सामंथाच्या हाती लागलेल्या या हॉलिवूड सिनेमाचं नाव 'अरेंजमेंट्स ऑफ लव' (Arrangements of Love) आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन बाफ्टा अवॉर्ड विजेते दिग्दर्शक फिलिप जॉन करणार आहेत. फिलिप जॉन यांनी अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन शो केले आहेत. त्यात द गुड कर्मा हॉस्पिटल आणि डाऊनटाउन एबे यांसारख्या शोजचा समावेश आहे.
नव्या सिनेमाची निर्मिती सुनीता टाटीचं प्रॉडक्शन हाऊस गुरू फिल्म्स करणार आहे. अरेंजमेंट्स ऑफ लव हा सिनेमा २००४ साली याच नावाने आलेल्या एका कादंबरीवर आधारित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामंथा यात एका भारतीय डिटेक्टिवची भूमिका साकारेल. सामंथा सिनेमात आल्याने टीम आनंदी आहे. या बातमीनंतर सामंथाचे फॅन्सही उत्साही आहे.
सामंथाने 'द फॅमिली मॅन २'च्या माध्यमातून साउथबाहेर नॉर्थमध्येही आपली फॅन फॉलोईंग वाढवली आहे. तेच सामंथाच्या दुसऱ्या कामाबाबत सांगायचं तर सामंथाने अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदानाच्या आगामी पुष्पा सिनेमात आयटम नंबर करण्याची घोषणा केली आहे. याचं शूटींग लवकरच सुरू होईल.