Samantha बनली लाखों दिलो की धडकन! दीपिका,आलिया आणि कतरिना याचं वाढवलं टेंशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 13:53 IST2022-11-25T07:00:00+5:302022-11-25T13:53:54+5:30
पुष्पा फेम समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu)नं प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Samantha बनली लाखों दिलो की धडकन! दीपिका,आलिया आणि कतरिना याचं वाढवलं टेंशन
Most Popular Female Film Star In India For October 2022: पुष्पा फेम समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समंथाने तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही ती तितकीच फेमस आहे. इतकेच नाही तर लोकप्रियतेच्या बाबतीत समांथाने बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे. होय, Ormax मीडियाने ऑक्टोबर 2022 साठी सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींची लिस्ट प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये समंथा रुथ प्रभुचे नाव वर आहे.
Ormax मीडियाने ट्विटरवर ऑक्टोबर 2022 साठी सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींची स्टारची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. या यादीत समंथा रुथ प्रभू पहिल्या क्रमांकावर आहे, तर आलिया भट दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत साऊथपासून बॉलिवूड अभिनेत्रींची नावे आहेत ज्या एकमेकांना टक्कर देत आहेत. या यादीत दीपिका पादुकोणला पाचवं स्थान देण्यात आले आहे. या यादीत तिच्या पुढे नयनतारा आणि काजल अग्रवाल आहेत.
Ormax मीडियाच्या या यादीत अशा अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे ज्यांना प्रेक्षकांची पसंती मिळली आहे. दीपिका पादुकोणनंतर या यादीत रश्मिका मंदान्ना सहाव्या तर कतरिना कैफ सातव्या क्रमांकावर आहे. या यादीत अनुष्का शेट्टीला 8, तर कीर्ती सुरेशला 9 वे स्थान मिळाले आहे. या यादीत त्रिशा 10व्या स्थानावर आहे. प्रसिद्ध अभिनेत्रींच्या या यादीत साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्रीने बाजी मारली आहे. या यादीत केवळ 3 बॉलिवूड अभिनेत्रींना स्थान मिळवतं आहे.
समंथा रुथ प्रभू सध्या साऊथ सिनेमाची डिमांडिंग अभिनेत्री बनली आहे. नुकताच तिचा 'यशोदा' हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.