घटस्फोटानंतर सामंथा पहिल्यांदाच आली लोकांसमोर, ज्युनिअर NTR ने विचारलेल्या प्रश्नांना देत होती उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 14:56 IST2021-10-12T14:56:15+5:302021-10-12T14:56:54+5:30
Samantha Ruth Prabhu : सामंथा आणि नागा चैतन्यने २ ऑक्टोबरला घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत याची माहिती फॅन्सना दिली होती

घटस्फोटानंतर सामंथा पहिल्यांदाच आली लोकांसमोर, ज्युनिअर NTR ने विचारलेल्या प्रश्नांना देत होती उत्तरे
साउथ सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) घटस्फोटानंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली आहे. ती ज्यूनिअर NTR चा गेम शो 'Mvaru Meelo Koteeswarulu'मध्ये गेस्ट सेलिब्रिटी म्हणून दिसली. चॅनल शोचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात सामंथा हॉटसीटवर बसून उत्तर देताना दिसत आहे.
'Mvaru Meelo Koteeswarulu' च्या नवरात्री स्पेशल एपिसोडमध्ये सामंथाला बघून तिचे फॅन्स फार आनंदी आहेत. व्हिडीओत सामंथा आणि ज्यूनिअर NTR गेमसोबत काही गमती-जमती करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. 'Mvaru Meelo Koteeswarulu' हा शो कौन बनेगा करोडपतीचं तेलुगु व्हर्जन आहे.
या शो चे पहिले दोन एपिसोड नागार्जुनने होस्ट केले होते. नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत सामंथाचं लग्न झालं होतं. शोचा चौथा सीझन चिरंजीवीने होस्ट केला होता. आता जेमिनी टीव्ही असलेल्या या शोचा होस्ट ज्यूनिअर NTR आहे.
२ ऑक्टोबरला केली घटस्फोटाची घोषणा
सामंथा आणि नागा चैतन्यने २ ऑक्टोबरला घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत याची माहिती फॅन्सना दिली होती. सामंथाने लिहिलं होतं की, बऱ्याच विचारानंतर मी आणि चैतन्यने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मला आशा आहे की, आमच्यातील मैत्री नेहमीच अशीच राहिल'.
सामंथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. लग्नाआधी दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. दोघांनी अनेक सिनेमात आणि जाहिरातींमध्ये एकत्र कामही केलं. लग्नाच्या चार वर्षानंतर ही साउथची सुपरहिट जोडी वेगळी झाली.