​सलमान म्हणाला, ‘मैं इंडियन हूं’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 05:40 IST2016-03-10T12:40:26+5:302016-03-10T05:40:26+5:30

अवैध शिकारीसंदर्भातील एका प्रकरणात अभिनेता सलमान खान  आज गुरुवारी जोधपूर न्यायालयात हजर झाला. मी निर्दोष आहे, असे बयान सलमानने ...

Salman said, 'I am Indian' | ​सलमान म्हणाला, ‘मैं इंडियन हूं’

​सलमान म्हणाला, ‘मैं इंडियन हूं’

ैध शिकारीसंदर्भातील एका प्रकरणात अभिनेता सलमान खान  आज गुरुवारी जोधपूर न्यायालयात हजर झाला. मी निर्दोष आहे, असे बयान सलमानने न्यायालयासमक्ष दिले. गतवेळीप्रमाणे याही सुनावणीत न्यायाधीशांनी सलमानला जातीबाबत विचारले.  यावर ‘मैं इंडियन हूं’ असे उत्तर सलमानने दिले. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’च्या चित्रीकरणादरम्यान अवैध शस्त्रास्त्रांनी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे. या प्रकरणाची आज सुनावणी झाली. सर्व साक्षीदारांनी तुझ्याविरूद्ध साक्ष्य दिली आहे, असे न्यायाधीशांनी म्हटल्यावर मी निर्दोष आहे, असे सलमानने सांगितले. एका वृत्तपत्राने याप्रकरणी वाढवून चढवून लिहिले. यानंतर वनविभाग आणि मीडियाच्या दबावामुळे माझ्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. माझ्याजवळ मी निर्दोष असल्याचे पुरावे आहेत, असेही सलमानने सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ एप्रिलला होणार आहे, तेव्हा बघू यात पुढे काय होते ते!!

 
 

Web Title: Salman said, 'I am Indian'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.