सलमान खानच्या ट्यूबलाइटचे पाचवे पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2017 08:07 AM2017-05-04T08:07:35+5:302017-05-04T13:37:35+5:30

बॉलिवूडचा दंबग खान सलमान खानच्या ट्यूबलाइट चित्रपटाचे पाचवे टीजर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सलमानने स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांने ...

Salman Khan's TubeLight's fifth poster-out | सलमान खानच्या ट्यूबलाइटचे पाचवे पोस्टर आऊट

सलमान खानच्या ट्यूबलाइटचे पाचवे पोस्टर आऊट

googlenewsNext
लिवूडचा दंबग खान सलमान खानच्या ट्यूबलाइट चित्रपटाचे पाचवे टीजर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सलमानने स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांने हे पोस्टर शेअर केले आहे. आतपर्यंत या चित्रपटाचे 4 पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. 

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाचा टीजर रिलीज होण्याच्या 5 दिवस आधीपासूनच सलमान रोज के पोस्टर टीजर रिलीज करतोय. सलमान खानचा हा कबीर खानसोबतचा तिसरा चित्रपट आहे. याआधी कबीरच्या बजरंगी भाईजान एक था टायगर या चित्रपटात सलमान आपल्याला दिसला होता.  ट्यूबलाइट कबीर खान ईदच्या दिवशी रिलीज करणार आहे.मात्र पाकिस्तानात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही आहे. पाकिस्तानातील काही निर्मात्यांनी याला विरोध केला आहे. ईदच्या दिवशी तिकडे चित्रपट प्रदर्शित होणार आहे जर ट्यूबलाईट ही त्याच दिवशी प्रदर्शित झाला तर त्याचा फटका तिकच्या चित्रपटांना बसेल असे पाकिस्तानच्या स्थानिक निर्मात्यांचे म्हणणे आहे.  
ट्यूबलाइटची शूटिंग लेह, लद्दाख आणि मनाली येथे झाली आहे. या चित्रपटचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यात सलमान आणि शाहरुख दोघांमध्ये एकत्र दिसणार आहेत. यात शाहरूख खान कॅमिओ करणार आहे.चित्रपटात भारत - इंडो युद्धाप्रसंगीची कथा दाखविण्यात आली आहे.  चित्रपटात सोहोल खानचीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 

Web Title: Salman Khan's TubeLight's fifth poster-out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.