'बॅटल ऑफ गलवान'च्या सेटवरून सलमान खानचा फोटो लीक; 'भाईजान'सोबत दिसली ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:43 IST2025-12-06T17:42:26+5:302025-12-06T17:43:10+5:30
Salman Khan : सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' (Battle Of Galwan) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान, चित्रपटाच्या सेटवरून अभिनेत्याचा एक फोटो लीक झाला आहे, ज्यात त्याच्यासोबत एक अभिनेत्रीही दिसत आहे.

'बॅटल ऑफ गलवान'च्या सेटवरून सलमान खानचा फोटो लीक; 'भाईजान'सोबत दिसली ही अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता त्याचे चाहते त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटामुळे उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच तो सतत चर्चेत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही, परंतु त्यासंदर्भातील अपडेट्स समोर येत राहतात. दरम्यान आता 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान खान अभिनेत्री चित्रांगदा सिंगसोबत (Chitrangada Singh) दिसत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत पाहायला मिळतंय की सलमान खान आणि चित्रांगदा सिंग दिसत आहेत. हे दोन्ही स्टार्स आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, सलमान खानसोबत चित्रांगदा सिंग देखील 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात सैनिकाची भूमिका साकारत आहे.
LATEST SALMAN KHAN #Salmankhan#BattleOfGalwan@IChitrangdapic.twitter.com/DC2XgE7Cv4
— 👑 GalwanValley (@neelikhan7786) December 5, 2025
'बॅटल ऑफ गलवान'बद्दल
सलमान खान आणि चित्रांगदा सिंगचा हा चित्रपट २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चीन आणि भारताच्या सैनिकांमधील चकमकीवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता कर्नल बी. संतोष बाबू यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अपूर्वा लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर झालेली नाही. हा चित्रपट २०२६ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सलमान खान येत्या २७ डिसेंबरला आपला ६०वा वाढदिवस साजरा करणार आहे, त्यामुळे चाहते या खास दिवशी एका सरप्राईजची अपेक्षा करत आहेत. चाहत्यांना वाटते आहे की 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाशी संबंधित कोणतीतरी मोठी घोषणा होऊ शकते. सलमान खान शेवटचा मार्चमध्ये रिलीज झालेल्या 'सिकंदर' चित्रपटात दिसला होता आणि त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता.