सलमान खान दोन्ही पुतण्यांना करणार लाँच? हॅलो ब्रदरसारखीच 'ब्रोमान्स फिल्म' असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 16:04 IST2024-03-18T16:04:11+5:302024-03-18T16:04:45+5:30

दोन्ही भावांच्या मुलांसाठी धावून आला 'काका' सलमान खान

Salman Khan will launch both nephew Arhaan and Nirvaan a bromance film like Hello Brother | सलमान खान दोन्ही पुतण्यांना करणार लाँच? हॅलो ब्रदरसारखीच 'ब्रोमान्स फिल्म' असल्याची चर्चा

सलमान खान दोन्ही पुतण्यांना करणार लाँच? हॅलो ब्रदरसारखीच 'ब्रोमान्स फिल्म' असल्याची चर्चा

सध्या बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींपेक्षा स्टारकीड्चीच चर्चा आहे. अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सुहाना खान यांच्यानंतर आणखी स्टारकीड्स पदार्पणाच्या तयारित आहेत. सलमान खानचे दोन भाचे सुद्धा अभिनयात येऊ शकतात अशी चर्चा आहे. यामध्ये अरबाज खानचा मुलगा अरहान (Arhaan Khan) आणि सोहेल खानचा मुलगा निर्वान (Nirvaan Khan) यांची चर्चा आहे. अरहान काही दिवसांपूर्वीच रवीना टंडनची मुलगी राशा थडानीसोबत दिसला. दोघंही एकाच सिनेमातून डेब्यु करु शकतात असं बोललं जात आहे. दरम्यान आता काका सलमान खान दोन्ही पुतण्यांना सिनेमात लाँच करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अरहान आणि निर्वान या दोन्ही भावांना एखाद्या 'ब्रोमान्स मूव्ही' मधून लाँच केलं जाईल अशी चर्चा सुरु आहे. सलमान आणि अरबाज यांचा 'हॅलो ब्रदर' सारखाच हा सिनेमा असू शकतो. अरबाजने मात्र या चर्चा चुकीच्या असल्याचं सांगितलं आहे. तो म्हणाला, 'मला माहित नाही. माझ्यामते या अफवा आहेत. अजून माझ्या कानापर्यंत ही बातमी आलेली नाही. अरहानला अभिनयात रस आहे आणि तो सध्या यासाठी ट्रेनिंग घेत आहे. त्याला काय करायचंय हे स्पष्ट आहे. तो सध्या फिल्मस्कूलमध्ये जात आहे आणि इतरही कामं करत आहे. तो करिअरवर लक्ष देत आहे. तो २२ वर्षांचा आहे अजून तरुण आहे. भविष्यासाठी तो स्वत:ला तयार करत आहे. तो खूप मेहनती, प्रामाणिक आणि डेडिकेटेड मुलगा आहे. जर सगळं ठीक राहिलं, त्याचं लक्ष नीट असेल आणि नशीब साथ देत असेल तर तो नक्कीच यशस्वी होईल.'

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहानने अमेरिकेतील लाँग आयलँड येथील फिल्म स्कूलमध्ये शिक्षण घेतले. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, सलमान खान आपल्या दोन्ही भावांच्या मुलांना बॉलिवूड ब्रोमान्स फिल्ममध्ये लाँच करण्याच्या तयारित आहे. सलमानने त्याची भाची, बहीण अलविरा खानची मुलगी अलिजेह अग्निहोत्रीला गेल्या वर्षीच लाँच केले. 

Web Title: Salman Khan will launch both nephew Arhaan and Nirvaan a bromance film like Hello Brother