Video : चाहतीसोबत सेल्फी घेत होता सलमान खान, बाबा सिद्दीकींनी हातच ओढला; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 16:54 IST2023-04-17T16:54:48+5:302023-04-17T16:54:59+5:30
एक बुरखा घातलेली महिला गर्दीतच सलमान खानसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Video : चाहतीसोबत सेल्फी घेत होता सलमान खान, बाबा सिद्दीकींनी हातच ओढला; Video व्हायरल
दरवर्षी ईदच्या मुहुर्तावर कॉंग्रेस नेता बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. यासाठी दरवर्षी बॉलिवूड तारेतारकांची गर्दी जमते. शाहरुख सलमानचं भांडण काही वर्षांपूर्वी याच इफ्तार पार्टीत संपुष्टात आलं होतं आणि दोघांनी गळाभेट घेतली होती. त्यामुळे ही इफ्तार पार्टी चांगलीच गाजली होती. काल नुकत्याच झालेल्या इफ्तार पार्टीतील सलमान खानचा (Salman Khan) एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. चाहतीसोबत सेल्फी घेताना सलमान खानला बाबा सिद्दीकी अक्षरश: ओढताना दिसत आहेत.
सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये एक बुरखा घातलेली महिला गर्दीतच सलमान खानसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर जवळच थांबलेले बाबा सिद्दीकी हे सलमानचा हात ओढताना दिसत आहेत. तर बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी त्या महिलेला 'हो गया हो गया' असं ओरडताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या इफ्तार पार्टीत सलमान खानसह प्रिती झिंटा, शहनाझ गिल, पूजा हेगडे, शाहरुख खान,उर्मिला मातोंडकर, सुनील शेट्टी, नेहा धुपिया अशा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तसेच अनेक टीव्ही सेलिब्रीटीही पार्टीत सहभागी झाले होते.