एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 15:55 IST2024-09-20T15:54:51+5:302024-09-20T15:55:21+5:30

सततच्या धमक्यांमुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता सलमानचा दुबईतील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Salman Khan viral video from dubai shopping mall amid threats | एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल

एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल

अभिनेता सलमान खान (Salman Khan)  सध्या सुरक्षेच्या कारणांमुळे चर्चेत आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून त्याच्या जीवाला धोका आहे. आधी त्याच्या राहत्या घरी गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाला. तर दोन दिवसांपूर्वीच सलीम खान यांना मॉर्निंग वॉकदरम्यान धोकादायक अनुभव आला. आता सलमान खानचादुबईतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो मॉलमध्ये शॉपिंग करताना दिसतोय.

सततच्या धमक्यांमुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता सलमानचा दुबईतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. आजूबाजूला बॉडीगार्ड्स आणि मध्ये सलमान मॉलमध्ये फिरताना दिसतोय. क्लोदिंग सेक्शनमध्ये तो अगदी  त्याच्या कॅज्युअल अंदाजाने लक्ष वेधलंय. सलमानचा एकदम मस्तमौला अंदाज पाहून चाहतेही वेडे झालेत. सुपरस्टारला सामान्यांसारखं फिरताना पाहून त्यांनी सलमानचं कौतुक केलं आहे. 

सलमान खानचे दुबईतही अनेक चाहते आहेत. दुबईतील उच्चभ्रूंशीही सलमानचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याचे येथील अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

सलमान लवकरच आगामी 'सिकंदर' सिनेमात दिसणार आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमात रश्मिका मंदाना, काजल अगरवाल, शर्मन जोशी, प्रतिक बब्बरही दिसणार आहे. 

Web Title: Salman Khan viral video from dubai shopping mall amid threats