राजपाल यादवच्या मदतीसाठी इंडस्ट्री सरसावली, सलमान खान-वरुण धवनचाही समावेश; मॅनेजरने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:23 IST2026-02-11T15:21:37+5:302026-02-11T15:23:31+5:30
काय म्हणाले राजपाल यादवचे मॅनेजर?

राजपाल यादवच्या मदतीसाठी इंडस्ट्री सरसावली, सलमान खान-वरुण धवनचाही समावेश; मॅनेजरने दिली माहिती
सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव अडचणीत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं. ९ कोटींच्या कर्ज भरु न शकल्याने त्याला कोर्टाने शिक्षा सुनावली. दरम्यान आता त्याच्या मदतीसाठीबॉलिवूडचे अनेक कलाकार पुढे सरसावले आहेत. सोनू सूद, गुरमीत चौधरीने राजपालला मदत केल्याची पोस्ट शेअर केली होती. तर आता बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खाननेही मदत केल्याचं समजत आहे. राजपालच्या मॅनेजरनेच ही माहिती आहे.
राजपाल यादवचा मॅनेजर गोल्डी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, "राजपालच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटी सरसावले आहेत. सोनू सूद, सलमान खान, अजय देवगणने सपोर्ट केला आहे. डेविड धवन यांचाही फोन येऊन गेला आहे. त्यानेही मदत केली आहे. रतन नैन, वरुण धवन अनेक जण त्याच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. राजपाललाही हे समजल्यावर समाधान वाटलं आहे."
तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यापूर्वी राजपालने सहकलाकारांकडून मदत मागितलेली का? यावर मॅनेजर गोल्डी म्हणाले, "यावर मी सध्या काहीच कमेंट करु इच्छित नाही. पण इंडस्ट्री त्यांच्यासोबत पर्वताप्रमाणे खंबीर उभी आहे. याबद्दल बोललं गेलं पाहिजे. सर्वांनीच आश्वासन दिलं आहे पण रातोरात हे व्यवहार होऊ शकत नाहीत. कुटुंबालाही मानसिकरित्या खंबीर राहावं लागेल. राजपाल भाई स्ट्राँग आहेत. घरी काही फॅमिली फंक्शनही होते. तोपर्यंत राजपाल भाऊंची सुटका व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. उद्या या केसप्रकरणी सुनावणी आहे. त्यामुळे उद्यापर्यंत राजपालची सुटका होऊ शकते. जामीनाचा अर्ज आधीच फायनल केला आहे. उद्या सुनावणीनंतर मी आणखी माहिती शेअर करेन."