सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:25 IST2025-05-09T13:24:56+5:302025-05-09T13:25:48+5:30
आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार सलमान खान

सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' सिनेमा चांगलाच आपटला. गेल्या काही वर्षांपासून सलमान बिग स्क्रीनवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. त्याचे अनेक सिनेमे जोरदार आपटले आहेत. अॅटलीसोबतच्या त्याचा सिनेमाचीही चर्चा थांबली आहे. मात्र तरी त्याच्याकडे इतर अनेक बिग बजेट सिनेमे आहेत. त्यातच एक म्हणजे गलवान व्हॅली वादावर आधारित वॉर ड्रामा सिनेमात सलमान सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
सलमान खान लवकरच संजय दत्तसोबत 'गंगाराम' सिनेमात दिसणार आहे. शिवाय 'बजरंगी भाईजान २' सुद्धा सुरु होणार असल्याची चर्चा आहे. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार सलमान सर्वात आधी अपूर्व लखियाच्या दिग्दर्शनाखाली सिनेमाचं शूटिंग करणार आहे. मिड डे रिपोर्टनुसार, पुढील पाच महिने सलमान गलवाल वॅलीत झालेल्या युद्धावरील सिनेमात व्यग्र असणार आहे. यामध्ये तो आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहे. सलमानने सिनेमा साईन केला असून लवकरच शूट सुरु होणार आहे.
रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की सलमानला 'बजरंगी भाईजान २'चंही शूट करायचं होतं. मात्र कबीर खान या प्रोजेक्टपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला सिनेमा दिग्दर्शित करायची इच्छा नाही. मात्र सलमानला कबीर खानच दिग्दर्शक हवा आहे.
'सिकंदर'नंतर सलमानकडे अनेक स्क्रिप्ट्स आल्या. त्यामध्ये त्याला गलवान व्हॅलीची कहाणीच जास्त आवडली. 2020 साली गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या युद्धावर सिनेमा आधारित आहे. दिग्दर्शक अपूर्व लखिया लवकरच शूटिंग शेड्युल फायनल करणार आहे. यानंतर सलमान या सिनेमातच व्यग्र होणार आहे. लद्दाखमध्ये सिनेमाचं शूट होणार असून सलमान खान स्वत: याची निर्मिती करेल अशीही चर्चा आहे.