'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मधील सिटी मार'साठी सलमान खानने अल्लू अर्जुनचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 17:33 IST2021-04-26T17:19:27+5:302021-04-26T17:33:27+5:30
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’मधील 'सिटी मार' हे गाणे खूप चर्चेत आहे.

'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मधील सिटी मार'साठी सलमान खानने अल्लू अर्जुनचे मानले आभार
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’मधील 'सिटी मार' हे गाणे खूप चर्चेत आहे. सलमान खानची सिग्नेचर डांस स्टाइलसोबत, तरुणाईची सध्याची आवडती हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पटानीसोबतची त्याची जोडी, शेख जानी बाशा ज्यांना जानी मास्टर नावाने ओळखले जाते त्यांची कोरियोग्राफी आणि प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार, ‘सिटी मार’मध्ये प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावत आहे .या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर गायले असून शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे ज्यांनी या आधी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ तयार केला होता.
Thank u Allu arjun for seeti maar absolutely loved the way u have performed in the song, the way u dance, your style, u r simply fantastic.. tk care n b safe. Rgds to ur family .. love u brother @alluarjun#SeetiMaarhttps://t.co/St8cWOmNKX
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 26, 2021
हे गाणे 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या एका तेलुगु चित्रपटातील हिट गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन आहे. सलमानने अल्लू अर्जुनचे 'सिटी मार'साठी आभार मानत ट्विट केलं आहे. यावर अल्लू अर्जुनने सुद्धा सलमान खानला थँक्यू म्हटले आहे,
जानी मास्टर आणि प्रभुदेवाने हिप-हॉपसोबत क्लासिक साउथ स्टाइल कोरियोग्राफीचे उत्तम मिश्रण सादर केले आहे. सोबतच, सलमान आणि दिशा दोघांनीही आपल्या सेंसेशनल केमिस्ट्री आणि उमद्या डांस मूव्स सर्व कसोट्यांना खऱ्या उतरल्या आहेत ज्या बघताना तुम्हीदेखील त्यावर ठेका धरण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत.