३१ वर्षीय लहान रश्मिकासोबत रोमान्स केल्यामुळे ट्रोल; सलमान म्हणाला- "तिला मुलगी झाल्यावर मी.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 10:42 IST2025-03-24T10:42:21+5:302025-03-24T10:42:59+5:30

३१ वर्षीय लहान अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत सिकंदर सिनेमात रोमान्स केल्यामुळे ट्रोल झालेल्या सलमानने खास उत्तर दिलंय (salman khan, rashmika mandanna, sikandar)

salman khan talk about romance with rashmika mandanna in sikandar movie trailer | ३१ वर्षीय लहान रश्मिकासोबत रोमान्स केल्यामुळे ट्रोल; सलमान म्हणाला- "तिला मुलगी झाल्यावर मी.."

३१ वर्षीय लहान रश्मिकासोबत रोमान्स केल्यामुळे ट्रोल; सलमान म्हणाला- "तिला मुलगी झाल्यावर मी.."

काल सलमान खानच्या (salman khan) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'सिकंदर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला.  'सिकंदर' (sikandar) सिनेमाच्या रिलीजला काही दिवस बाकी असूनही ट्रेलर का येत नाहीये, असा सर्वांना प्रश्न पडलेला. अखेर काल मुंबईत प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत  'सिकंदर' सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्यात सलमानचा मिश्किल अंदाज पाहायला मिळाला. याशिवाय सलमान आणि रश्मिकाची (rashmika mandanna) क्यूट बाॅन्डींगही सर्वांना दिसून आली. 

गेल्या काही दिवसांपासून सलमानला रश्मिकासोबत रोमान्स करत असल्याने ट्रोल करण्यात येतंय. सलमान आणि रश्मिकाच्या वयामध्ये अंतर बघता लोकांनी भाईजानला ट्रोल केलं होतं. सलमानने ३१ वर्षीय रश्मिकासोबत 'सिकंदर' सिनेमात रोमान्स केल्याने अनेकांना या जोडीची मस्करी केली. अखेर काल  'सिकंदर'च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात सलमानने मोजकंच उत्तर देऊन ट्रोलर्सची बोलती बंद केली.

सलमान ट्रोलिंगवर काय म्हणाला?

सलमान खान ट्रेलर लाँचला याविषयी म्हणाला की, "जर हिरोईनला काही प्रॉब्लेम नाहीये, तिच्या बाबांना काय प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला काय अडचण आहे? पुढे रश्मिकाचं लग्न होईल, तिला मुलगी होईल, ती मुलगीही मोठी होऊन स्टार बनेल तर मी तिच्यासोबतही काम करेन. तिच्या (रश्मिका) नवऱ्याची परवानगी यासाठी नक्कीच मिळेल ना?" अशाप्रकारे सलमानने मिश्किल अंदाजात सर्वांची बोलती बंद केली. यावेळी रश्मिकानेही होकारार्थी मान हलवली.




पुढे रश्मिकाचं कौतुक करत सलमान म्हणाला की, "रश्मिका संध्याकाळी ७ पर्यंत पुष्पा २ चं शूटिंग करायची. पुढे रात्री ९ वाजता सिकंदरच्या सेटवर यायची. त्यानंतर पहाटे ६.३० पर्यंत ती आमच्यासोबत शूटिंग करायची. मधल्या काळात तिची तब्येतही बरी नव्हती. पायाला लागलं असूनही तिने शूटिंगमध्ये कोणताही खंड पडू दिला नाही. एकही दिवस शूटिंग रद्द नाही केली. तिला बघून मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण येते."

Web Title: salman khan talk about romance with rashmika mandanna in sikandar movie trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.