अरे देवा! 'करण अर्जुन'च्या सेटवर सलमानने रागाच्या भरात शाहरुखला मारली गोळी; पुढे काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 10:15 IST2025-03-13T10:14:47+5:302025-03-13T10:15:48+5:30
'करण अर्जुन'च्या सेटवर सलमानने रागाच्या भरात शाहरुखला गोळी मारली. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आवर्जुन हा किस्सा वाचा (shahrukh khan, salman khan)

अरे देवा! 'करण अर्जुन'च्या सेटवर सलमानने रागाच्या भरात शाहरुखला मारली गोळी; पुढे काय घडलं?
'करण अर्जुन' (karan arjun) सिनेमा कोणी पाहिला नाही, असा माणूस आढळणं दुर्मिळच. या सिनेमातील गाणी, कलाकारांचा अभिनय आणि मुख्य गोष्ट म्हणजे सिनेमाची अफलातून कथा अशा सर्व गोष्टींचं कौतुक झालं. 'करण अर्जुन'मध्ये सलमान खान, शाहरुख खान (shahrukh khan) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमामुळे सलमान-शाहरुखच्या करिअरला नवी दिशा मिळाली. पण याच सिनेमाच्या सेटवर भाईजान सलमानने (salman khan) शाहरुखला पिस्तुलातून गोळी मारली होती. काय घडलं नेमकं?
'करण अर्जुन'च्या सेटवर सलमानने गोळी मारली अन...
'करण अर्जुन' सिनेमात भूमिका साकारणारे अभिनेते जॉनी लिव्हर यांनी या घटनेचा खुलासा एका मुलाखतीत केला. सलमान 'करण अर्जुन'च्या सेटवर काहीतरी कारण शोधून शाहरुखची मस्करी करायचा. किंग खानला सलमानच्या मस्करीचं वाईट वाटून मस्करीची कुस्करी होईल, अशी सर्वांना भीती वाटायची. अशातच एके दिवशी, सलमानने शाहरुखला डान्स करायला बोलावलं. शाहरुखने मनाई केली. भाईजानला राग आला अन् दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. परिणामी सलमानने शाहरुखला गोळी मारली.
या गोष्टीमुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. गोळीमुळे जमिनीवर पडलेल्या शाहरुखला पाहून मेकर्सला घाम फुटला. पण नंतर काही क्षणात शाहरुख जमिनीवरुन उठला. शाहरुखला सुखरुप बघून सर्वांच्या जीव भांड्यात पडला. खरंतर सलमानने प्रॉप म्हणजेच नकली बंदुक वापरली होती. सलमान-शाहरुखचा हा पूर्वनियोजीत प्लान होता. यामध्ये सर्व फसले आणि दोन्ही सुपरस्टार्सचा डाव यशस्वी झाला. परंतु या दोघांनी केलेल्या प्रँकमुळे इतरांची काहीक्षण बोलती बंद झाली होती. 'करण अर्जुन' सिनेमा काही दिवसांपूर्वी री-रिलीज करण्यात आला होता.