सलमान खानच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली, 'टायगर 3' OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 17:20 IST2023-12-04T17:18:59+5:302023-12-04T17:20:03+5:30

सलमानचा टायगर कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार याबद्दल अपडेट समोर आलं आहे.

Salman Khan s Tiger 3 will release on OTT platform Amazon Prime soon starring katrina kaif Emran Hashmi | सलमान खानच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली, 'टायगर 3' OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

सलमान खानच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली, 'टायगर 3' OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

सलमान खानचा (Salman Khan) दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या 'टायगर 3' (Tiger 3) चांगलाच गाजला. एक था टायगर आणि टायगर जिंदा है नंतर टायगर ३ नेही चांगली कमाई केली. जगभरात सिनेमाने 450 कोटींचा व्यवसाय केला. तर भारतात सिनेमाने ३०० कोटी पार केले. आता सिनेमाच्या OTT रिलीजची चर्चा आहे. सलमानचा टायगर कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार याबद्दल अपडेट समोर आलं आहे.

माध्यम रिपोर्टनुसार, टायगर ३ रिलीजनंतर महिनाभराने ओटीटीवर येण्यास सज्ज आहे. अॅमेझॉन प्राईमवर' टायगर ३' चाहत्यांना बघता येणार आहे. याआधी शाहरुख खानचा पठाण प्राईमवर आला होता.आता टायगर 3 ही प्राईमवर लवकरच येणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तसंच ज्यांना थिएटरमध्ये टायगर ३ पाहता आलेला नाही ते नक्कीच आतुर आहेत. 

१२ नोव्हेंबर रोजी 'टायगर 3' रिलीज झाला होता. पहिल्या काही दिवसात सिनेमाने तुफान कमाई केली. आता १ डिसेंबरला रणबीर कपूरचा Animal रिलीज झाला असून या सिनेमाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातलाय. याचा परिणाम 'टायगर 3' वर झालेला पाहायला मिळतोय. लवकरच टायगर ३ थिएटरमधून बाहेर पडेल आणि ओटीटीवर पाहता येणार आहे.

Web Title: Salman Khan s Tiger 3 will release on OTT platform Amazon Prime soon starring katrina kaif Emran Hashmi