'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री कन्फर्म? स्टारकास्टच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 11:14 IST2024-10-25T11:11:07+5:302024-10-25T11:14:38+5:30

'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

Salman Khan s cameo as chulbhul pandey in singham again movie confirm starcast post viral | 'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री कन्फर्म? स्टारकास्टच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री कन्फर्म? स्टारकास्टच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

दिवाळीच्या मुहुर्तावर दोन धमाकेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बऱ्याच सुपरस्टार्सची फौज असलेला रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' (Singham Again)  आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैय्या 3' हे दोन्ही सिनेमे १ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहेत. या दोन बहुप्रतिक्षित सिनेमांमध्ये काँटे की टक्कर होणार आहे. दरम्यान 'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

'सिंघम अगेन'ची स्टारकास्ट अजय देवगण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि रोहित शेट्टी प्रत्येकाने आपापल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये सगळे एकत्र आले. त्यांच्या या एकत्रित कँडिड फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहते तर आतुर झाले आहेत. दरम्यान सर्वांच्या कॅप्शनमध्ये एक गोष्ट लक्षवेधी आहे. अक्षय कुमारने लिहिले, 'हम सबने मिलके की बहुत सी चुलबुल बाते की'. 

कॅप्शनमधील 'चुलबुल' या शब्दाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. सलमान खानने त्याच्या सुपरहिट 'दबंग' सिनेमात चुलबुल पांडे या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली जी प्रचंड लोकप्रिय झाली. आता रोहित शेट्टीच्या या कॉप युनिव्हर्समध्ये चुलबुल म्हणजेच भाईजानचीही एन्ट्री झाली आहे हे जवळपास कन्फर्मच झालं आहे. सलमान खानचा 'सिंघम अगेन' मध्ये कॅमिओ असणार आहे. सिंघम अगेनच्या तगड्या स्टारकास्टमध्ये अजून एका सुपरस्टारची भर पडल्याने आता हा सिनेमा आणखी मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे. 

'सिंघम अगेन' सिनेमात अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका आहे. 

Web Title: Salman Khan s cameo as chulbhul pandey in singham again movie confirm starcast post viral