सलमान खानने जाळला होता त्याच्या वडिलांचा अख्खा पगार, त्यानेच सांगितला बालपणीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 10:30 AM2022-12-26T10:30:47+5:302022-12-26T10:41:52+5:30

Happy Birthday Salman Khan : सलमान खान 27 डिसेंबरला त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशात या रिअॅलिटी शोमध्ये पोहोचलेल्या मनीष पॉलने त्याच्या वाढदिवसानिमित्ताने काही फन अॅक्टिविटी केल्या. 

Salman Khan reveals he burnt father Salim Khan salary | सलमान खानने जाळला होता त्याच्या वडिलांचा अख्खा पगार, त्यानेच सांगितला बालपणीचा किस्सा

सलमान खानने जाळला होता त्याच्या वडिलांचा अख्खा पगार, त्यानेच सांगितला बालपणीचा किस्सा

googlenewsNext

Happy Birthday Salman Khan : बिग बॉस शो ची नेहमीच काहीना काही कारणाने चर्चा होत असते. कलाकारांचे अनेक सीक्रेट्स यातून नेहमीच समोर येत असतात. सोबतच सलमान खानचेही अनेक किस्से ऐकायला मिळतात. सलमान खान 27 डिसेंबरला त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशात या रिअॅलिटी शोमध्ये पोहोचलेल्या मनीष पॉलने त्याच्या वाढदिवसानिमित्ताने काही फन अॅक्टिविटी केल्या. 

सलमान खानने शोमध्ये खुलासा केला की, त्याच्याशी संबंधित अनेक किस्से केवळ अफवा नाहीत. सत्य आहेत. फक्त फिरवण्यात आले आहेत. मनीष पॉलने सलमान खानला एका अफवेबाबत विचारलं की, एका दिवाळीला तुम्ही वडिलांचे पूर्ण पगाराचे पैसे जाळले होते का?

या अफवेवर उत्तर देताना सलमान खानने सांगितलं की, त्यावेळी तो 6 वर्षाचा होता. त्याचे वडील इंदुरवरून मुंबईला आले होते. त्यावेळी घर चालवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दिवाळीच्या दिवशी त्याच्याकडून एक चूक झाली होती. सलमान म्हणाला की, दुपारच्या वेळी मी बास्केटमध्ये काहीतरी जाळत होतो. मी पेपर, कागद त्यात टाकायला शोधत होतो. मग मी पाहिलं की, माझे वडील काही कागद एका ठिकाणी ठेवत आहेत. मी तेही घेतले आणि जाळले. नंतर मला समजलं की, मी साधारण साडे सातशे रूपये जाळले. आई मला खूप ओरडली होती. पण वडील काहीच म्हणाले नाही.

सलमानने सांगितलं की, त्यावेळी त्याच्या परिवाराची स्थिती फार वाईट होती. इंदुरवरून वडील 60 रूपये घेऊन मुंबईला आले होते. दिवाळीच्या त्या महिन्यात आईला घर चालवण्यासाठी खूप अडचण आली होती. शेजाऱ्यांना समजलं तर त्यांनी मदत केली. सगळे तसेच होते. त्यांना समजलं तर कुणी काही पाठवलं, कुणी काही दिलं. त्यातून महिना चालला.
 

Web Title: Salman Khan reveals he burnt father Salim Khan salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.