सलमानने कागदावर रेखाटलं होतं आमिरच्या 'गजनी' लूकचं चित्र; 2008 सालचं पेटिंग होतंय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 13:59 IST2024-05-10T13:57:09+5:302024-05-10T13:59:42+5:30

Salman khan: सलमानने आमिरचं चित्र काढून त्याच्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं होतं.

salman-khan-painting-skills-madhe-a-portrait-of-aamir-khan-s-ghajini-avatar | सलमानने कागदावर रेखाटलं होतं आमिरच्या 'गजनी' लूकचं चित्र; 2008 सालचं पेटिंग होतंय व्हायरल

सलमानने कागदावर रेखाटलं होतं आमिरच्या 'गजनी' लूकचं चित्र; 2008 सालचं पेटिंग होतंय व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) त्याच्या अभिनयासह इतक कलागुणांमुळेही चर्चेत येत असतो. सलमान उत्तम गायक आहे, चित्रकार आहे. त्यामुळे तो त्याच्या या टॅलेंटमुळेही चर्चेत येत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याची एक पेंटिंग चर्चेत आली आहे. सलमानने चक्क अभिनेता आमिर खान याच्या गजनी सिनेमातील त्याच्या लूकचं चित्र काढलं आहे.

२००८ मध्ये आमिर खानचा (aamir khan) 'गजनी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात आमिरसोबत अभिनेत्री असीनने स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बराच गाजला होता. हा सिनेमा ज्यावेळी रिलीज झाला त्याचवेळी सलमानने या सिनेमातील आमिरच्या लूकचं पेंटिंग तयार केलं होतं. त्यामुळे त्याची ही जुनी पेटिंग पुन्हा एकदा चर्चेत  आली आहे.

आमिरच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सलमानने हे चित्र रेखाटलं होतं. सोशल मीडियावर त्याची ही जुनी पेटिंग चर्चेत आली असून असीन ते चित्र दाखवतांना दिसत आहे.

दरम्यान, सलमान सध्या 'सिकंदर' या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करत असून हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: salman-khan-painting-skills-madhe-a-portrait-of-aamir-khan-s-ghajini-avatar