'या' दोन अभिनेत्रींसोबत सलमान खानला करायचंय काम, ३३ आणि ३१ वर्षांनी आहेत लहान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:38 IST2025-03-27T16:38:07+5:302025-03-27T16:38:19+5:30
सलमान खान याला बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय अभिनेत्रींसोबत काम करण्याची इच्छा आहे.

'या' दोन अभिनेत्रींसोबत सलमान खानला करायचंय काम, ३३ आणि ३१ वर्षांनी आहेत लहान
Salman Khan: बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानबरोबर काम करण्याची संधी मिळणे म्हणजेच एखाद्या कलाकारासाठी सोने पे सुहागा… फिल्म इंडस्ट्रीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी सलमानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकाला सलमानसोबत काम करण्याची इच्छा असते. पण, खुद्द सलमान खान याला बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय अभिनेत्रींसोबत काम करण्याची इच्छा आहे. त्या दोन्ही अभिनेत्री या स्टारकीड आहेत.
सलमान खानने ज्या दोन अभिनेत्रींसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या दोन्ही अभिनेत्री त्याच्यापेक्षा ३३ आणि ३१ वर्षांनी लहान आहेत. सलमान याने 'सिंकदर' चित्रपटामध्ये ३१ वर्षांनी लहान रश्मिकासोबत काम केलं आहे. वयात एवढं अतंर असलेल्या अभिनेत्रीसोबत काम केल्यानं त्याला अनेकांनी ट्रोल केलं. यानंतर बुधवारी पत्रकार परिषदेत सलमानने भविष्यात अनन्या पांडे (Ananya Panday) आणि जान्हवी कपूरसोबत (Janhvi Kapoor ) काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सलमान म्हणाला, "जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांच्यासोबत काम मला करायचे असेल तर लोक माझ्या पुढे मोठ्या समस्या आणि कठीण परिस्थिती नक्कीच निर्माण करतील. वयातील अंतरावर बोलतील. मुळात म्हणजे मी हा विचार करून त्यांच्यासोबत काम करतो की, त्यांना पुढे चांगल्या संधी मिळतील". अनन्या सलमानपेक्षा ३३ वर्षांनी लहान आहे आणि जान्हवी त्याच्यापेक्षा ३१ वर्षांनी लहान आहे. तर सलमान हा सध्या ५९ वर्षांचा आहे. दरम्यान, सलमानचा 'सिंकदर' हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादॉस यांनी केलंय.