'धुरंधर-२' मुळे बदलली सलमानच्या 'मातृभूमी सिनेमाची रिलीज डेट? अखेर खरं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:40 IST2026-03-21T12:38:03+5:302026-03-21T12:40:29+5:30
सलमान खानच्या बहुचर्चित 'मातृभूमी' सिनेमाची रिलीज डेट का बदलली, 'हे' आहे खरं कारण

'धुरंधर-२' मुळे बदलली सलमानच्या 'मातृभूमी सिनेमाची रिलीज डेट? अखेर खरं कारण आलं समोर
Salman Khan Matrubhumi Movie: बॉलिवूड भाईजान म्हणजेच सलमान खान हा त्याच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असतो. त्याच्या सिनेमाची प्रेक्षक मोठ्या आतुरतने वाट बघत असतात. सध्या सलमान हा त्याच्या आगामी चित्रपट मातृभूमीमुळे प्रसिद्धीझोतात आहे. मात्र,हा चित्रपट चर्चेत राहण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्याच्या नावात आणि प्रदर्शनात होत असलेल्या विलंबामुळे. अलिकडेच या चित्रपटाचं बॅटल ऑफ गलवान हे नाव बदलून 'मातृभूमी' असं ठेवण्यात आलं आहे. शिवाय एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार असलेल्या या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अनेकांना धुरंधर-२ मुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलली गेल्याचं वाटत होतं. अशातच यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.
दरम्यान, स्क्रिप्टमध्ये महत्त्वाचे बदल आणि काही अनपेक्षित अडचणींमुळे निर्मात्यांना हा निर्णय घ्यावा लागला. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, सलमानच्या मातृभूमी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचं मोठं कारण म्हणजे अभिनेता प्रशांत तमांगच्या निधन असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन आयडॉल ३ चा विजेता प्रशांतला 'मातृभूमी'मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी निवडण्यात करण्यात आली होती. प्रशांत यांनी चित्रपटातील अनेक महत्त्वाचे सीन्स देखील शूट केलं होतं. मात्र, प्रशांत यांच्या निधनामुळे सिनेमाची बरीच शूटिंग करायची राहून गेली. प्रशांत तमांग यांचा कार्डियतक अरेस्टमुळे मृ्त्यू झाला आणि संपूर्ण टीमसमोर मोठं आव्हान उभं राहिलं.
तसेच चित्रपटाच्या टीमने प्रशांत यांचे काही सीन्स रि-शूट करण्याचा निर्णय देखील घेतला होता. मात्र, त्यात संपूर्ण अॅक्शन सीक्वेंस असल्यामुळे ते सहज शक्य होणार नसल्याचं टीमचं म्हणणं आहे. त्याचबरोबर प्रशांत तमांग यांच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्याला कास्ट करण्याचा विचार देखील सुरु आहे.
चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचं झाल्यास, मात-भूमी सिनेमा सुरुवातीला एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात सलमान खानसह अभिनेत्री चित्रांगदा सिंह सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, चाहते त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.या चित्रपटाचं दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.