Video: अखेर सलमानने टेकले गुडघे; 'या' व्यक्तीसमोर भाईजान झाला नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 15:02 IST2022-06-05T16:51:43+5:302022-06-15T15:02:44+5:30

Salman khan: अलिकडेच सलमान खान IIFA 2022 पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी झाला होता. यावेळी सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली.

salman khan gets pleased by little fan abdu rozik song hugs him sitting on his knees video viral | Video: अखेर सलमानने टेकले गुडघे; 'या' व्यक्तीसमोर भाईजान झाला नतमस्तक

Video: अखेर सलमानने टेकले गुडघे; 'या' व्यक्तीसमोर भाईजान झाला नतमस्तक

अभिनेता सलमान खान (salman khan) याला लहान मुलं किती आवडतात हे साऱ्यांनाच ठावूक आहे. सोशल मीडियावर अनेकदा त्याचे आणि लहान मुलांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर सलमानचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका लहान मुलासमोर झुकल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, लहान दिसणारी हा मुलगा नसून एक प्रसिद्ध गायक आहे. सोशल मीडियावर भाईजानचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अलिकडेच सलमान खान IIFA 2022 पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी झाला होता. यावेळी सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. मात्र, सलमान स्वत: या गायकाचा चाहता झाला. या चाहत्यासोबत सलमानने फोटो काढत त्याला मिठी मारली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध गायक abdu rozik हे सलमानसोबत दिसत असून त्यांनी 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणं गायलं .abdu rozikहे ज्या पद्धतीने मन लावून गाणं म्हणत होते ते पाहून सलमान भारावून गेला. आणि, त्याने abdu rozik यांना आलिंगन दिलं. 

दरम्यान, सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. अनेकांनी सलमानचं कौतुक केलं आहे. यापूर्वी सलमानचा विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात त्याने चाहत्याला चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली होती. त्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं होतं.
 

Web Title: salman khan gets pleased by little fan abdu rozik song hugs him sitting on his knees video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.