"घर ते शूटिंग, एअरपोर्ट ते हॉटेल; गेल्या २५-२६ वर्षात मी...", सलमान खानचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:23 IST2025-12-12T17:22:31+5:302025-12-12T17:23:27+5:30
सलमान खानने 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये 'इन कन्वर्सेशन विथ'या चॅट सेशनवेळी करिअर आणि लाईफस्टाईलबद्दल खुलासा केला.

"घर ते शूटिंग, एअरपोर्ट ते हॉटेल; गेल्या २५-२६ वर्षात मी...", सलमान खानचा खुलासा
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमात दिसणार आहे. नुकताच तो दुबईतील रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने एक वेगळाच खुलासा केला जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. सलमान गेल्या २५ वर्षांपासून बाहेर डिनरला गेलेला नाही असं तो म्हणाला? पण यामागचं कारण काय हेही त्याने सांगितलं.
सलमान खानने 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये 'इन कन्वर्सेशन विथ'या चॅट सेशनवेळी करिअर आणि लाईफस्टाईलबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, "२५-२६ वर्ष झाली मी बाहेर डिनरला गेलेलो नाही. शूटिंग ते घर, घर ते शूटिंग, घर ते एयरपोर्ट, एअरपोर्ट ते हॉटेल, हॉटेल ते आता असे इव्हेंट...बस, हेच माझं आयुष्य आहे."
तो पुढे म्हणाला, "मला यात काहीच अडचण नाही. एक तर तुम्ही फिरा, मजा मस्ती करा. हे प्रसिद्धी वगैरे काही नको. लोक इतकं प्रेम आणि आदर देतात त्यासाठीच मी मेहनत घेतो. मध्ये मध्ये थोडा आळशीही होतो. पण मी पुढे काय होणारे हे एन्जॉयही करतो."
आपल्या जवळच्या माणसांना गमावल्याच्या दु:खाबद्दल सलमान म्हणाला, "माझं आयुष्य जास्त करुन कुटुंब आणि मित्रांच्या आसपासच असतं ज्यांपैकी अनेक जण मला सोडून गेलेत. आता फक्त ४-५ चंच आहेत जे खूप आधीपासून माझ्यासोबत आहेत. पण अभिनेता म्हणून माझा प्रवास कायमच सोपा नव्हता."