VIDEO : सलमान खानचा आई सलमा खानसोबत डान्सचा जुना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 13:24 IST2020-12-16T13:21:09+5:302020-12-16T13:24:38+5:30

हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की, सलमान खान त्याची आई सलमा खानच्या फार जवळ आहे. त्याने २०१९ मध्ये आईसोबतचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

Salman Khan dances with mom Salma Khan video went viral on 2019 | VIDEO : सलमान खानचा आई सलमा खानसोबत डान्सचा जुना व्हिडीओ व्हायरल

VIDEO : सलमान खानचा आई सलमा खानसोबत डान्सचा जुना व्हिडीओ व्हायरल

सलमान खानने कोरोना काळात काही सिनेमांचं शूटींग सुरू केलं आहे. त्याचे शूटींगचे आणि निवांत वेळ घालवतानाचे फोटो-व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. तो रागीट दिसत असला तरी पर्सनल लाइफमध्ये परिवाराची खूप काळजी घेणारा आहे असं नेहमी सांगितलं जातं. सध्या त्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की, सलमान खान त्याची आई सलमा खानच्या फार जवळ आहे. त्याने २०१९ मध्ये आईसोबतचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यात तो आईसोबत 'चीप थ्रिल्स' वर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्याने कॅप्शन दिलं आहे की, बंद करा हे नाच-गाणं...

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, सलमानची आई त्याच्यासोबत हळूहळू डान्स करत आहे. डान्स करता करता ती त्याला मिठी मारते. नंतर सलमा खान व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याला बंद कर असं म्हणताना दिसतात. सलमान खानचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन्सना फारच आवडलाय. इन्स्टाग्रामवर ५० लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केलाय.

दरम्यान, सलमान खानने 'राधे' सिनेमाचं शूटींग पूर्ण केलंय. तर त्याने आत 'अंतिम' या महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाचं शूटींग सुरू केलं आहे. हा सिनेमा 'मुळशी पॅटर्न' सिनेमाचा हिंदी रिमेक असून यात सलमान मुख्य भूमिकेत दिसेल.
 

Web Title: Salman Khan dances with mom Salma Khan video went viral on 2019