Video : सलमानच्या सुरक्षारक्षकांनी विकी कौशललाही बाजूला केलं, अभिनेत्याचे चाहते सलमानवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:10 PM2023-05-26T12:10:50+5:302023-05-26T12:11:57+5:30

सलमान खानची एंट्री होताच त्याच्या बॉडीगार्ड्सने चक्क विकी कौशललाही बाजूला केल्याचं पाहायला मिळालं.

salman khan bodyguards pushed vicky kaushal away at iifa press conferrence | Video : सलमानच्या सुरक्षारक्षकांनी विकी कौशललाही बाजूला केलं, अभिनेत्याचे चाहते सलमानवर नाराज

Video : सलमानच्या सुरक्षारक्षकांनी विकी कौशललाही बाजूला केलं, अभिनेत्याचे चाहते सलमानवर नाराज

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आयफा सोहळ्यासाठी (IIFA) कालल अबू धाबीला पोहोचला. इतरही स्टार्स सोहळयासाठी दाखल झाले. विकी कौशल, अभिषेक बच्चन यांचे देखील व्हिडिओ समोर आले. दरम्यान सलमान खानची एंट्री होताच त्याच्या बॉडीगार्ड्सने चक्क विकी कौशललाही बाजूला केल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

सलमान खानला मिळणाऱ्या सततच्या धमक्यांनंतर त्याच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली. सलमानच्या भोवती सतत सुरक्षारक्षकांचा गराडा असतो. दरम्यान काल सलमान खान आयफा सोहळ्यासाठी पोहोचला असता विकी कौशल आधीच तिथे चाहत्यांसोबत सेल्फी घेत होता. त्यातच सलमानची एंट्री झाली. सुरक्षारक्षकांसोबत सलमान विकी कौशलच्या बाजूने जात होता.  तेव्हा विकी कौशल सलमानशी हात मिळवायला आणि बोलायला आला. सलमानही दुरुनच त्याच्याशी बोलला मात्र सुरक्षारक्षकांनी विकी कौशललाही बाजूला केल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसून आलं.

या व्हिडिओवर आता नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विकीला सर्वसामान्यांसारखं बाजूला केलंय, पण सलमानच्या सुरक्षेचं कारणही आपल्याला माहित आहे' अशी कमेंट एकाने केली आहे तर विकीच्या चाहत्यांनी मात्र सलमानवर नाराजी व्यक्त केली आहे. अबुधाबी येथे आयफा सोहळ्याची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी हा प्रकार घडला.

Web Title: salman khan bodyguards pushed vicky kaushal away at iifa press conferrence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.